भूकंप प्रवण क्षेत्रांचे झोननिहाय सूक्ष्म निरीक्षण

By Admin | Updated: April 29, 2015 02:42 IST2015-04-29T02:42:08+5:302015-04-29T02:42:08+5:30

राज्यात अनेक शहरे अशी आहेत जिथे भूंकपाचा धोका आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (आयएमडी) अशा शहरांची याची यादी तयार केली आहे.

Zonal Micro Inspection of Earthquake prone areas | भूकंप प्रवण क्षेत्रांचे झोननिहाय सूक्ष्म निरीक्षण

भूकंप प्रवण क्षेत्रांचे झोननिहाय सूक्ष्म निरीक्षण

वसीम कुरेशी  नागपूर
राज्यात अनेक शहरे अशी आहेत जिथे भूंकपाचा धोका आहे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने (आयएमडी) अशा शहरांची याची यादी तयार केली आहे. या यादीतील शहरांची झोननिहाय विभागणी करून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) विभाग झोननिहाय सूक्ष्म निरीक्षण करणार आहे.
जीएसआय पूर्वमध्ये मुंबई, नाशिक व पुण्याचा अभ्यास केल्यानंतर आता सातारा, वारणा आणि कोयनाचा अभ्यास सुरू केला आहे. यात हे निरीक्षण केले जात आहे की, भूकंप आल्यानंतर किती नुकसान होऊ शकते आणि ते कोणत्या भागात होऊ शकते, यापासून वाचण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यावर अभ्यास केला जात आहे. जीएसआयने इमारतीची बनावट आणि निर्माणाचे प्रकारही आपल्या अभ्यासात अंतर्भूत केले आहे. विभागाचे उपमहासंचालक कुटुंबराव यांच्या मार्गदर्शनात संचालक दिनेश गणवीर, भूकंप भूविज्ञानचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुकेश वर्मा व भूवैज्ञानिक एस. जायस्वाल यांचा सहभाग आहे. नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Zonal Micro Inspection of Earthquake prone areas