शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

युग चांडक अपहरण हत्याप्रकरणी आरोप निश्चित

By admin | Updated: December 24, 2014 00:45 IST

लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठवर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले.

मुख्य आरोपीला मिळाला वकीलनागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठवर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. लवकरच या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ होण्याचे संकेत आहेत. गत सुनावणीच्या वेळी मुख्य आरोपीच्यावतीने खटला लढणारे अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता लिगल एडमार्फत अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल यांना मुख्य आरोपीची बाजू मांडण्यासाठी नेमण्यात आलेले आहे. या खटल्यात राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना आणि अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका हे आरोपी आहेत. १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास आरोपींनी १० कोटी रुपयाच्या खंडणीसाठी युगचे अपहरण केले होते. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात त्याचा खून केला होता, असा आरोपींविरुद्ध आरोप आहे. या खटल्यात १०० जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी या खटल्याचा कार्यक्रम ठरणार आहे. सरकार पक्षाच्या वकील ज्योती वजानी ह्या हा खटला चालविणार आहेत. फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांनी सरकार पक्षाला साहाय्य व्हावे म्हणून अ‍ॅड. राजेंद्र डागा यांना नेमले आहे. कुश कटारिया अपहरण-हत्याप्रकरणातही त्यांनी सरकारला साहाय्य केले होते. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)