शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी यांच्या त्यागातून युवकांनी प्रेरणा घ्यावी : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:41 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देइतवारी शहीद चौक येथून निघाली सद्भावना रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवक आघाडीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही इतवारी शहीद चौक येथून मोठ्या उत्साहात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.संस्थेचे प्रमुख पिंटू बागडी यांनी प्रास्ताविकातून मागील ३३ वर्षापासून आकर्षक चित्ररथासह काढण्यात येत असलेल्या सद्भावना रॅलीची माहिती दिली. रॅली इतवारी येथून निघाल्यानंतर शहरातील विविध भागातून फिरली. यावेळी विकास ठाकरे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री,कमलेश समर्थ, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डॉ गजराज हटेवार, महेश श्रीवास, हसमुख सागलानी, रवी गाडगे पाटील, , उमेश शाहू, जयंत लुटे,रिंकू जैन, अंकुश बागडी आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षाला मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा संकल्प करा, हीच इंदिरा गांधी यांना खरी आदरांजली होईल. असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले. अतुल कोटेचा म्हणाले, इंदिरा गांधी यांनी गरिबांसोबतच देशाची सेवा केली. यामुळे त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण के ले. रॅलीच्याआयोजनाबाबत कोटेचा यांनी बागडी यांचे अभिनंदन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बाभूळगाव बँड, मंदलदिप बँडच्या कलावंतांनी सर्वांची मने जिंकली. सराफा बाजार, इतवारी मित्रमंडळ व जागनाथ रोड व्यापारी संघाने रॅलीचे स्वागत केले.तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, नगरसेवक, राष्ट्रीय युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन महामंत्री रिंकू जैन यांनी तर आभार अंकुश बागडी यांनी मानले.कार्यक्रमासाठी सुरेश अग्रेकर, युवराज श्रीरंग, मोंटी गंडेचा, हर्षित भंसाळी,पुरु षोत्तम शर्मा, मुन्ना लखेटे, गोपाल पट्टम, इरशाद शेख, अशोक जर्मन, मोतीराम मोहाडीकर, गुल्लू ढकहाँ, दिनेश पारेख, प्रमोद मोहाडीकर, प्रभाकर खापरे, दिलीप गांधी,राजेंद्र नंदनकर, श्रीकांत ढोलके, रवी पराते, नागेश आसानी, मुन्ना शर्मा, अशोक निखाडे, बाबा ठाकूर, अनिल पौनिपगार ,रवी हिरणवार आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षVikas Thakreविकास ठाकरे