रेल्वेने कटून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST2021-09-16T04:12:09+5:302021-09-16T04:12:09+5:30

कळमेश्वर : रेल्वेने कटून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या घाेराड-घाेगली रेल्वे रुळावर साेमवारी (दि. १३) ...

Young man killed by train | रेल्वेने कटून तरुणाचा मृत्यू

रेल्वेने कटून तरुणाचा मृत्यू

कळमेश्वर : रेल्वेने कटून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्यांतर्गतच्या घाेराड-घाेगली रेल्वे रुळावर साेमवारी (दि. १३) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

मनू रंजन दास (३५, रा. पला नदीया, २४ परभणा, वेस्ट बंगाल, हल्ली मु. घाेराड, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. मनू हा मागील अडीच वर्षांपासून नवीन बायपास रिंगराेड घाेराड येथील पुलाच्या बांधकामावर हाेता. दरम्यान, घाेराड ते घाेगली रेल्वे रुळावर रेल्वेने कटून ताे मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी विश्वनाथ भावेश सरकार (३८, रा. उत्तर २४ परभणा, जि. आगरपाडा जननगरी, वेस्ट बंगाल, ह. मु. घाेराड) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक मुंडे करीत आहेत.

Web Title: Young man killed by train