क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:10 IST2021-01-21T04:10:08+5:302021-01-21T04:10:08+5:30

काटाेल : क्षुल्लक कारणावरून आराेपीने शिवीगाळ करीत तरुणास मारहाण केली. या प्रकरणी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ...

Young man beaten for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

काटाेल : क्षुल्लक कारणावरून आराेपीने शिवीगाळ करीत तरुणास मारहाण केली. या प्रकरणी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खानगाव येथे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

सागर प्रकाश मडावी (१९, रा. खानगाव, ता. काटाेल) असे अटकेतील आराेपीचे नाव असून, किशाेर रामदास चापके (२९, रा. खानगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. किशाेर हा गावातील गणेश बाेटरे यांच्या किराणा दुकानासमाेर उभा असताना, आराेपीने तेथे येऊन त्यास धक्का दिला. किशाेरने आराेपीला ‘मला धक्का का मारला?’ विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून आराेपीने किशाेरला शिवीगाळ करून हातातील लाेखंडी कड्याने डाेक्यावर मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि कलम ३२६, ५०४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार जवाहर चव्हाण करीत आहेत.

Web Title: Young man beaten for trivial reasons