शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुख्यात गुंडांकडून तरुणीची छेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 11:28 IST

तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे.

ठळक मुद्देविरोध करणाऱ्यांनाही मारहाणअजनी पोलिसांनी केली गुंडांची पाठराखण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांची पाठराखण करून, गुंडांचा प्रतिकार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची अजनी पोलिसांची भूमिका नागरिकांमध्ये रोष निर्माण करणारी ठरली आहे. हे प्रकरण वरिष्ठांकडे पोहचल्यामुळे आणि वरिष्ठांकडून कानउघाडणी केली जाऊ शकते, हे ध्यानात आल्यामुळे तब्बल सात दिवसानंतर अजनी पोलिसांनी कुख्यात गुंड लकी तेलंग आणि मंगेश टिचकुलेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.११ ऑगस्टच्या रात्री ९.१५ वाजताचे हे प्रकरण आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित तरुणी (वय २२) भाड्याने राहते. ती मोबाईल शॉपीत काम करते. ११ ऑगस्टला ती आपल्या भाड्याच्या घरासमोर घरमालकासोबत गप्पा करीत असताना, तेथे कुख्यात गुंड लकी तेलंग आणि मंगेश टिचकुले आला. त्यांनी तरुणीला अश्लील हातवारे करीत तिची छेड काढली. मंगेश टिचकुलेने तुझे उठाके ले जाना है, गेम बजाना है, असे म्हटले. तरुणीने विरोध केला असता तिला मारहाण केली. घरमालकाने यावेळी आरोपींना हटकले असता त्यावेळी आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळेने आपल्या पाच-सात साथीदारांसह आरोपी तेथे पोहचले. त्यांनी घरमालकाला अश्लील शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला. विरोध करण्यासाठी पुढे आलेले घरमालक, बाजूचे तरुण आणि आरोपींमध्ये हाणामारी झाली. त्यात एक आरोपी जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर अजनी पोलीस पोहचले. पोलिसांनी आरोपी लकी, मंगेश आणि घरमालक अशा सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.तरुणीची छेड काढणाऱ्या गुंडांना हटकणे, त्यांचा विरोध करणे गुन्हा आहे का, अशी विचारणा घरमालकाने केली, यावरून अजनी पोलिसांचा इगो हर्ट झाला. त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नका, असे म्हणत कुख्यात लकी आणि साथीदारांच्या तक्रारीवरून गंभीर गुन्हा दाखल करून घरमालकाला पहाटे ४ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले आणि घरमालक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लकी आणि साथीदारांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी त्यांच्या हाती एनसी (अदखलपात्र) पावती देऊन त्यांना परत पाठविले. विशेष म्हणजे, ज्या तरुणीची छेड काढली तिला पोलीस ठाण्यात पोलिसांदेखतच आरोपी लकी आणि मंगेश टिचकुलेने अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली.गुंडांसोबतचे साटेलोटे उघडलकी तेलंग आणि मंगेश टिचकुले हे कुख्यात गुंड आहेत. ते त्यांच्या साथीदारांकडून अवैध धंदेही करवून घेतात. हे पोलिसांच्या रेकॉर्डवर असूनही अजनी पोलिसांनी घटनेच्या दिवशी ते जखमी असल्याचे सांगून, घरमालकाची त्यांच्याविरुद्ध तक्रार घेतली नाही. पोलिसांच्या या संतापजनक भूमिकेमुळे प्रकरण वरिष्ठांकडे पोहचले. वरिष्ठांनी अजनी पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर, या प्रकरणात शनिवारी त्या तरुणीची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणातून अजनी पोलिसांचे साटेलोटे उघड झाले आहे. गुंडांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ठाणेदारांना कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र,अनेक ठाण्यातील पोलीस गुंडांना पाठीशी घालतात. लकी तेलंग आणि मंगेश टिचकुलेच्या बाबतीत अजनी पोलिसांनी असाच प्रकार केला आहे. त्यामुळे आता या पोलिसांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग