यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मर्यादित स्वरुपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:15 IST2021-01-13T04:15:11+5:302021-01-13T04:15:11+5:30

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे; परंतु ...

This year's Jijau Janmotsav celebrations are limited | यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मर्यादित स्वरुपात

यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मर्यादित स्वरुपात

नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे; परंतु कोरोना महामारीमुळे यंदाचा जन्मोत्सव सोहळा हा अगदी मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे

सिंदखेड राजा परिसरात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कलम १४४ लागू केले आहे तसेच जमावबंदी आहे. जिजाऊ सृष्टी येथे मुख्य कार्यक्रमात वीस प्रमुख पाहुणे व पदाधिकारी यांना उपस्थित राहता येईल, असे आदेश दिले आहेत; तसेच कोणत्याही स्टॉल्सना उदा-जेवण, पुस्तके, साहित्य, पेय, पाणी यांना परवानगी दिली नाही.

या परिस्थितीत जिजाऊप्रेमींनी आपापल्या घरातच व गावातच शक्यतोवर कौटुंबिक पातळीवर जमेल तसा जिजाऊ जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.

Web Title: This year's Jijau Janmotsav celebrations are limited