शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण आणि नागपूर करार

By admin | Updated: March 12, 2015 02:45 IST

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. त्यावेळी सर्वदूर अविकसित असलेल्या महाराष्ट्राचा विकास करण्याची मोठी जबाबदारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर आली.

अविष्कार देशमुख  नागपूर१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. त्यावेळी सर्वदूर अविकसित असलेल्या महाराष्ट्राचा विकास करण्याची मोठी जबाबदारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर आली. आर्थिक, सामाजिक, राजकीय व लोकशाहीप्रधान पायाभूत सोयी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य यशवंतराव यांच्या वाटी आले. महाराष्ट्र सर्वदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, त्यासाठी पोषक व पूरक वातावरणाची गरज असताना यशवंतराव यांनी राज्याच्या प्रत्येक भागाचा विकास आराखडा तयार केला. अर्थातयात नागपूरचा व विदर्भाचादेखील समावेश होता. विदर्भाच्या विकासाकरिता यशवंतराव चव्हाण यांनी दादासाहेब कन्नमवार, गोपाळराव खेडकर, वसंतराव नाईक या मान्यवर पुढाऱ्यांची चांगली फळी तयार केली. त्यांची निवडही योग्य ठरली. या पुढाऱ्यांची चांगली साथ त्यांना मिळाली अन् धडाक्याने विदर्भाच्या विकासाकरिता सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भाचा मागासलेपणाचा विचार करून त्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अंदाजपत्रक तयार केले. त्यातूनच लोकसंख्येच्या प्रमाणात विकास खर्च व लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी देऊन बेकारी दूर करण्याचा विश्वास त्यांनी १९५३ सालच्या नागपूर करारात व्यक्त केला. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण यांनी त्याकाळी आवश्यक ते सर्व विकास घडवून आणले. आॅगस्ट १९७२ मध्ये कापूस एकाधिकार योजना कायदा अमलात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक त्याकाळी थांबली होती. विदर्भाच्या इतिहासात नागपूर करार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. संयुक्त महाराष्ट्र मागणीच्या काळात हा करार झाला, नागपूरसह विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात जायला तयार असल्याचे करारात स्पष्ट करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार विदर्भाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचंही करारात नमूद करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण आणि नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य रामराव पाटील यांनी पुढाकार घेऊन खुद्द दादांच्या रामराव पाटील यांच्या नागपूरच्या घरी या कराराचे प्रारूप तयार केले. ९ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्राच्या कायदेमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू होते. त्यासाठी यशवंतराव शहरात आले असता नागपूरच्या जनतेला भेटण्याची संधी त्यांना मिळत असल्याने मनाला आनंद होत आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते. यशवंतराव यांनी कायदेमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात व्हावे असे वचन जनतेला दिले होते ते त्यांनी हे अधिवेशन घेऊन पूर्ण केले. आज यशवंतराव जाऊन बरीच वर्षे झालीत मात्र त्यांनी विदर्भासह नागपूरला दिलेले महत्त्व अथवा केलेले जनसामान्यांच्या हिताचे ते निर्णय आजदेखील महाराष्ट्रात कोणीच कधीच विसरू शकणार नाही.