शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक!सावनेरमध्ये चौफेर संक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

सावनेर/काटोल/हिंगणा/नरखेड/रामटेक/कुही: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक वाढला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी २७६ रुग्णांची नोंद झाली. ...

सावनेर/काटोल/हिंगणा/नरखेड/रामटेक/कुही: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक वाढला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी २७६ रुग्णांची नोंद झाली. यातील ८४ रुग्ण एकट्या सावनेर तालुक्यातील आहे. तालुक्यात सावनेर शहर आणि दहेगाव येथे प्रत्येकी २०, खापरखेडा (१०), इसापूर (६), चनकापूर (४) तर खापा, गुजरखेडी, चिचोली प्रकाश नगर येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली. याशिवाय ब्रह्मपुरी, पिपळा, पाटणसावंगी, खेडी, वाघोडा नांदागोमुख, बडेगाव, रोहना, खैरीढालगाव, आजनी, वाकोडी आणि सावंगी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यातील कोरोना साखळी अधिक मजबूत होताना दिसत आहे. तालुक्यात सोमवारी पुन्हा २६ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी १३ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात आयु.डी.पी,तारबजार रामदेव बाबा ले-आउट येथे प्रत्येकी दोन रुग्ण तर रेल्वे स्टेशन, खोजा ले-आउट, जानकी नगर, शारदा चौक, चांडक नगर, थोमा ले-आउट ,पंचवटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये खानगाव येथे पाच तर गोंडीदिग्रस, डोरली (भिंगारे), रिधोरा, कोंढाळी, जुनापाणी, मसली, खापरी( केने), पारडसिंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात २८९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी, डिगडोह, हिंगणा प्रत्येकी ३ तर वागदरा, मोंढा , निलडोह, सुकळी करार व टाकळघाट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापार्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३८६ झाली आहे. यातील ४००८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कळमेश्वर तालुक्यात सोमवारी १२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ४ तर ग्रामीण भागात धापेवाडा येथे ५, मोहपा येथे तीन रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात ८ रुग्णांची नोंद झाली. रामटेक शहरात टिळक वॉर्ड, शास्त्री वॉर्ड व अंबाळा वॉर्ड येथे प्रत्येकी एक, तर ग्रामीण मधे मनसर येथे २, हिवरा बाजार व पंचाळा येथे प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११५८ झाली आहे. यातील १०१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नरखेडमध्ये पुन्हा ३० पार

गेल्या आठवड्यात रुग्ण संख्या आटोक्यात येत असलेल्या नरखेड तालुक्यात सोमवारी ३१ रुग्णांची नोंद झाली. यात शहरात ११ तर ग्रामीण भागात २० रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७६ तर शहरात ५७ इतकी झाली आहे. सोमवारी जलालखेडा येथे ३, मोवाड (१०), मेंढला (५) तर सिंजर येथे दोन रुग्णांची नोंद झाली.

कुहीत ९ रुग्णांची भर

गेल्या आठवड्यात बाधितांची संख्या दोन आकडी झालेल्या कुही तालुक्यात सोमवारी ९ रुग्णांची भर पडली. तालुक्यात मेंढेगाव, मांढळ येथे प्रत्येकी २ तर वेलतूर येथे ५ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात सोमवारी १६४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या.