शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी प्रतिकाराची मानसिकता बाळगावी

By admin | Updated: February 28, 2015 02:24 IST

महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

नागपूर : महिला-मुलींनी प्रतिकाराची मानसिकता बाळगली तर महिलांवरील अत्याचाराला आळा बसू शकतो, असे परखड मत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. सर्वोदय आश्रम आणि नागपूर महिला मंचतर्फे स्वातंत्र्य संग्राम सैनिक दमयंतीबाई धर्माधिकारी स्मृती स्त्रीशक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज सर्वोदय आश्रमात महाविद्यालयीन युवतींच्या चिंतन शिबिरात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मीरा खडक्कार (निवृत्त न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय) होत्या. चिंतन शिबिरात, महिलांवरील अत्याचार : कारणे आणि उपाय या विषयावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा केल्या जात असल्या तरी पुरुषप्रधान संस्कृतीचाच सर्वत्र वरचष्मा दिसतो. जी महिला किंवा मुलगी पुरुषांच्या सुरात सूर मिसळत असेल ती चांगली. जी नकार देत असेल, प्रतिकार करीत असेल किंवा मतभिन्नता व्यक्त करीत असेल, ती किती वाईट आहे, ते अधोरेखित करण्याची संधी पुरुष मंडळी शोधत असतात. मात्र, सर्वच पुरुष एकसारखेच नसतात, असे स्पष्ट करतानाचा डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या पाठीशी पुरुष कसे भक्कमपणे उभे राहतात, त्याचीही अनेक उदाहरणे सांगितली. निर्भया प्रकरणानंतर महिला हिताचे अनेक कायदे झाले आहेत. त्याची सर्वांना माहिती आणि कडक अंमलबजावणी झाली तर अत्याचाराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार यांनी अध्यक्षीय भाषणातून समाजाने महिलांवरील अत्याचाराकडे केवळ ‘स्त्रीची समस्या’ या दृष्टिकोनातून बघू नये, असे आवाहन केले. संपूर्ण समाज अत्याचारग्रस्त महिलेच्या पाठीशी उभा राहण्याची गरज त्यांनी विशद केली. बरेचसे अत्याचार दारूच्या नशेत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे दारुबंदीची कडक अंमलबजावणी व्हायला पाहिजे, असे सांगतानाच अत्याचारग्रस्त महिला-मुलींच्या पाठीशी महिलांनी भक्कमपणे उभे राहून एकीचे बळ दाखवावे, असे आवाहनही केले. अत्याचाराचा विषय येतानाच महिला-मुलींच्या पोषाखाचीही चर्चा होते. त्याचे विश्लेषण करताना खडक्कार यांनी संस्कृतीची जोपासना करून महिला-मुलींनी शालीनता कधीच सोडू नये, असा सल्लाही दिला. प्रारंभी डॉ. रूपा कुळकर्णी यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून देत चिंतन शिबिराचा उद्देश विशद केला. कार्यक्रमाचे संचालन विशाखा बागडे यांनी तर, आभारप्रदर्शन डॉ. कल्पना उपाध्याय यांनी केले. (प्रतिनिधी)