शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो नोकरी देणाऱ्या बना : कांचनताई गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:04 IST

आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना केवळ पुरुषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्यातील कौशल्य ओळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकावा, कौशल्याच्या बळावर उद्योगाची कास धरून इतरांनाही नोकरी देणाऱ्या बना, असा कानमंत्र संस्कारभारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी यांनी दिला.

ठळक मुद्देमहिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना केवळ पुरुषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्यातील कौशल्य ओळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकावा, कौशल्याच्या बळावर उद्योगाची कास धरून इतरांनाही नोकरी देणाऱ्या बना, असा कानमंत्र संस्कारभारतीच्या अध्यक्ष कांचनताई गडकरी यांनी दिला.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने शहर समृध्दी उत्सवांतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा शनिवारी समारोप झाला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. मंचावर वैशाली कोहळे, शोभा व्यास, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.कांचनताई म्हणाल्या, कुटुंबाची घडी व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला सक्षम असणे आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. उद्योग व्यवसायातही महिला पुढे येत आहेत. महापालिकेच्या वतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या माध्यमातून अनेक महिलांना मागील दहा वर्षापासून स्वयंरोजगाराचा मार्ग सापडला, ही बाब अभिनंदनीय आहे. उद्योगासाठी गुणवत्ता, पॅकेजिंग आणि वेळेचे व्यवस्थापन या तीन सूत्रांचा योग्य समन्वय आवश्यक आहे. अगदी छोट्या गोष्टींपासून आपणाला उद्योग सुरू करता येऊ शकतो. यासाठी केवळ आपली कल्पकता आणि बाजारातील मागणी यांचा योग्य विचार, अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्यातील गुणांची योग्य पारख आणि जोपासणा करून उद्योगासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करून उद्योगाला सुरुवात करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले.तत्पूर्वी महिला सशक्तीकरणाची मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जागर महिलांच्या जाणिवांचा, सावित्रीच्या लेकीचा असा संदेश असलेला बलून मान्यवरांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आला. प्रगती पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विशाखा मोहोड यांनी तर संचालन स्मिता खनगई यांनी केले. उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, झोन सभापती रूपाली ठाकूर, रिता मुळे, वंदना येंगटवार, संगीता गिऱ्हे, वंदना चांदेकर, सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका वैशाली नारनवरे, मनीषा अतकरे, स्वाती आखतकर, शीतल कांबळे, माजी नगरसेविका नीलिमा बावने उपस्थित होत्या.विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कारमहिला उद्योजिका मेळाव्यात फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, उद्योजिका प्रतीक्षा पटवारी, गौरी रंगनाथ, सामाजिक समरसता मंचच्या माया गायकवाड, शारदा सुरेश, शिक्षण क्षेत्रातील महिलांसाठी कार्य करणाऱ्या सुचेता मेश्राम, शोबिज एंटरटेन्मेंटच्या रूही अफजल, सची मलिक, सामाजिक संदेशासह देशभरात पाच हजार किमीची सायकल रॅली करणारा रितेश भोयर, माजी महापौर बैरणबाई यांच्यासह परिसरात लावण्यात आलेल्या उत्कृष्ट स्टॉल धारकांमधून नीती फाऊंडेशन या दिव्यांगांच्या स्टॉलच्या निर्मल घोडेस्वार, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील स्टॉलचे गजानन चोपडे, अथर्व महिला बचत गट स्टॉलच्या प्रतिभा कोल्हे, रिता भोंडे, कापडी पिशव्यांचे स्टॉल लावून प्लास्टिकसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या सुजाता मोकलकर यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लावणीच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.

 

टॅग्स :WomenमहिलाNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका