ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: May 26, 2023 02:22 PM2023-05-26T14:22:35+5:302023-05-26T14:24:26+5:30
वाडी पोलिस ठाण्यांतर्गतची घटना
![Woman's jewelery worth 98 thousand stolen from auto in nagpur | ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल Woman's jewelery worth 98 thousand stolen from auto in nagpur | ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/jrf78g-jkdoslf-kfs90olksbd-_2023051024976.jpg)
ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : बाहेरगावावरून आल्यावर ऑटोने घरी परतलेल्या महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागीने व रोख असा एकुण ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने लंपास केल्याची घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. कल्पना चंद्रशेखर पिल्लारे (वय ३६, रा. महादेवनगर, दत्तवाडी) असे या महिलेचे नाव आहे.
त्या आपला मुलगा व नातेवाईकांसह बाहेरगावावरून नागपुरात आल्या. जयप्रकाशनगर येथे उतरून त्या ऑटोने इतर प्रवाशांसह बसून आपल्या महादेवनगर येथील घरी परत आल्या. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या बॅगसह सामानाची पाहणी केली असता त्यातील सोन्याचे दागीने व रोख ११०० रुपये असा एकुण ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.