शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्रेते कायदेशीर लढा देणार

By admin | Updated: January 6, 2017 02:32 IST

राज्य, राष्ट्रीय आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने आणि बार हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडचे दिला आहे

संमेलनात व्यावसायिकांचा निर्णय : महामार्गावरील दारूची दुकाने हटविण्याचा आदेश नागपूर : राज्य, राष्ट्रीय आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने आणि बार हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडचे दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाने त्रस्त व व्यथित झालेल्या देशी दारूच्या व्यावसायिकांचे गुरुवारी मानकापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संमेलन पार पडले. यावेळी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढा देण्याचा आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने व बार न हटविण्यासाठी सरकारला निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातील २५०० पेक्षा जास्त देशी दारूचे विक्रेते सहभागी झाले होते. या वेळी मुंबईचे वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. वीणा थडानी, महाराष्ट्र राज्य देशी दारू विक्रेता महामंडळाचे अध्यक्ष एल. चव्हाण, नागपूर जिल्हा चिल्लर देशी दारू विक्रेता संघटनेचे रामकुमार मोटघरे, सुमेर एम. जयस्वाल, साहील जयस्वाल, अरविंद जयस्वाल, अरुण जयस्वाल, सचिन जयस्वाल, राज जयस्वाल, राजू मोहबंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. थडानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे विश्लेषण करताना त्यावर कायदेशीर तोडगा काढण्यावर मार्गदर्शन केले. तामिळनाडू आणि पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना तो सर्व राज्यांसाठी लागू केला. या आदेशामुळे महाराष्ट्रातील जवळपास २.५ लाखांपेक्षा जास्त मद्य विक्रेत्यांवर आर्थिक संकट येणार आहे. महाराष्ट्रात १० हजारांपेक्षा जास्त देशी दारूची दुकाने आहेत. त्यांचे मालक आणि कर्मचारी बेरोजगार होतील. त्यामुळे सरकारचे ७० ते ७५ टक्के महसुलाचे नुकसान होणार आहे. संमेलनात महाराष्ट्रातील देशी दारू विक्रेता संघटना, वाईन मर्चंट असोसिएशन आणि वाईन बार व रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार) या तिन्ही संघटनेच्या बॅनरखाली कायदेशीर लढाई आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारूची दुकाने व बार व्यावसायिकाना सूट देण्याची मागणी करणारे निवेदन सरकारला लवकरच सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी पुढील काही दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)