शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला सर्वच देणार काय?

By admin | Updated: March 6, 2015 00:29 IST

नागपूरला ‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘ट्रीपल आयटी’ यासारख्या मोठ्या संस्था मिळाल्या आहेत. आता तुम्हाला सर्वच देणार काय? तुम्हाला देत असताना दुसऱ्यांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा!

नागपूर : नागपूरला ‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘ट्रीपल आयटी’ यासारख्या मोठ्या संस्था मिळाल्या आहेत. आता तुम्हाला सर्वच देणार काय? तुम्हाला देत असताना दुसऱ्यांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा! हे शब्द दुसऱ्या तिसऱ्या कुणाचेही नसून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आहेत. उपराजधानीतील बहुप्रतिक्षित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुद्यावर त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी प्रांतिक भेदभाव करणारे हे वक्तव्य केले. विदर्भाचा इतक्या वर्षांचा अनुशेष भरून निघण्याची सुरुवात झाली असताना राज्यातील जबाबदार मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून नागपुरात ‘स्वाईन फ्लू’ ची दहशत असताना वैद्यकीय शिक्षण खात्याचादेखील भार सांभाळणारे विनोद तावडे यांनी दुपारच्या सुमारास मेयो इस्पितळाला भेट दिली. यावेळी त्यांना उपराजधानीतील शैक्षणिक क्षेत्राबद्दलदेखील विचारणा करण्यात आली. शासनाच्या उदासीन धोरणामुळे तीन वर्षांपूर्वी घोषित झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अजूनही कागदावरच असून जमिनीचे हस्तांतरण झालेले नाही. त्यावर शासनाची भूमिका काय याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. यावर तावडे यांनी सर्वांनाच धक्का देणारे उत्तर दिले. तुम्हाला ‘आयआयएम’, ‘ट्रीपल आयआयटी’सारख्या संस्था दिल्या. अजून काय द्यायचे? सर्व तुम्हालाच दिले तर इतर विभागांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा, असे त्यांनी प्रतिपादन केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुद्याला त्यांनी बगलच दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी नागपुरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. परंतु ‘एनआयटी’च्या अखत्यारितील या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासनाने या जागेसाठी २१ कोटी रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध करुन दिलेला नसून याची ‘फाईल’ मंत्रालयातच आहे. (प्रतिनिधी)