शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील सरपंच हत्याप्रकरणाच्या तपासात ‘एआय’चा वापर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By योगेश पांडे | Updated: December 16, 2024 16:43 IST

मुख्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा : आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई होणारच

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत मांडण्यात आला. या प्रकरणातील आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई करण्यात येईल. तसेच या प्रकरणाच्या तपासात तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडला होता. दानवे यांनी या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचा मुद्दा मांडला. यावर बोलताना फडणवीस यांनी सरकारीच भूमिका स्पष्ट केली. सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. फरार आरोपींना शोधण्यावर भर देण्यात येत आहे. सीआयडीकडे हे प्रकरण देण्यात आले असून त्यांच्या ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात येईल. ज्या पोलिसांनी या प्रकरणात कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांवर नाहक अंगुलीनिर्देश होतो
यावेळी फडणवीस यांनी राजकीय पक्ष व नेत्यांवर केलेल्या आरोपांवरदेखील भाष्य केले. हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असते. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे ज्यावेळी बोलले जाते, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतानादेखील त्यांच्याकडे कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो, असे फडणवीस म्हणाले. आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, अशा प्रकारचा विचार न करता घटनेत सहभागी असणार्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सBeedबीडsarpanchसरपंचnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन