शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची जमीन मोफत देणार का?

By admin | Updated: February 12, 2015 02:18 IST

महापालिके ची आर्थिक स्थिती बिकट आहे. परंतु मनाचा मोठेपणा कायम आहे. म्हणूनच प्रशासनाने कोट्यवधीची जमीन दानात देण्याची तयारी चालविली आहे.

नागपूर : महापालिके ची आर्थिक स्थिती बिकट आहे. परंतु मनाचा मोठेपणा कायम आहे. म्हणूनच प्रशासनाने कोट्यवधीची जमीन दानात देण्याची तयारी चालविली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.जरीपटका भागात टाऊ न हॉलसाठी ६१४४ चौ.मी. जमीन आरक्षित आहे. सोन्याचा भाव असलेल्या या जमिनीपैकी काही जमीन आधीच बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी दिली आहे. उर्वरित जमीन देण्याचा निर्णय झाला तर मनपाला कोट्यवधीचा फटका बसणार आहे. हा निर्णय घेतल्यास शहराच्या इतर भागात असलेल्या मनपाच्या जमिनी अशाच मोफत उपलब्ध कराव्यात यासाठी प्रशासनावर दबाव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रस्तावानुसार टाऊ न हॉलसाठी आरक्षित जमिनीपैकी अर्ध्या जागेवर आधीच बहुमजली इमारतीचे बांधकाम के ले असल्याने उर्वरित जागेवर टाऊ न हॉलचे बांधकाम शक्य नाही. त्यामुळे या जमिनीवरील ताबा सोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये आरक्षणात बदल करण्याचा अधिकार सभागृहाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव सभागृहापुढे ठेवला जाणार आहे. आरक्षित जमीन बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी उपलब्ध केली जाणार असल्याने टाऊ न हॉलसाठी पर्यायी जागा कुठे देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षण हटविण्याला समितीच्या काही सदस्यांचा विरोध आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. परंतु दबावामुळे काही पदाधिकारी प्रस्ताव मंजूर करण्याच्या विचारात असल्याची माहिती पुढे आली आहे.(प्रतिनिधी)