शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

नो एक्सचेंज कशासाठी ?

By admin | Updated: October 11, 2014 02:49 IST

एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, ....

नागपूर : एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असतानाही याचा प्रसार आणि प्रचार न झाल्याने ग्राहकांची लुबाडणूक सुरूच आहे. दिवाळी खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही बाब जागरूक ग्राहकांनी निदर्शनास आणून दिली आहे.कुठलीही वस्तू किंवा तत्सम माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना दुकानात ‘ एकदा खरेदी केलेला माल परत घेतला जाणार नाही’ असे लिहिलेले फलक टांगलेले दिसतात. अनेक मॉल्स, शोरूम्समध्येही ते आढळतात. व्यापारी त्यांच्या देयकावरही ही बाब प्रकर्षाने प्रसिद्ध करतात. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याने १८ आॅगस्ट २००१ ला एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदीनुसार दोषयुक्त वस्तू किंवा सेवेतील उणिवा, अधिक पैसे घेणे आदीसाठी ग्राहकाला व्यापाऱ्यांविरुद्ध दाद मागता येते. अशा वेळी ग्राहक मंच सदर वस्तू दुरुस्त किंवा बदल करून देण्यास संबंधितांना सांगू शकतो. विकसित देशात वस्तू खरेदी केल्यावर ग्राहक समाधानी नसेल तर ती बदलून देण्याची किंवा पैसे परत करण्याची हमी देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र एकदा विकलेला माल परत घेणार नाही, अशी अट व्यापाऱ्यांकडून टाकली जाते. अशी अट टाकणे नियमानुसार बेकायदेशीर आणि ग्राहक हिताविरुद्ध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या देयकावर ‘विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ अशी अट टाकू नये, असे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)