शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘नॉन एफएक्यू कॉटन’ची ‘अ‍ॅलर्जी’ का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:00 IST

‘सीसीआय’ने ‘नॉन एफएक्यू’ कापूस खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ४० टक्के ‘नॉन एफएक्यू’ कापसाच्या विक्रीची समस्या निर्माण झाली आहे.

सुनील चरपे।

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सीसीआय’ने ‘नॉन एफएक्यू’ कापूस खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ४० टक्के ‘नॉन एफएक्यू’ कापसाच्या विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. ‘नॉन एफएक्यू’ कापसाचा धागा आखूड असल्याने तसेच या धाग्याचा वापर जिन्स, अंडर गारमेंटच्या उत्पादनासाठी वापरला जातो. या कापसाला देशांतर्गत मागणी असताना तसेच सीसीआय आणि जिनर्सद्वारे या कापसाची विभागणी करून मिळत नसल्याने टेक्सटाईल इंडस्ट्रीज आखूड धाग्याची गरज आयात केलेल्या कापसावर भागवितात.जिन्स, टॉवेल, चादर, सतरंजी, अंडर गारमेंटच्या निर्मितीसाठी ‘काऊंट नंबर १८’ धाग्याची आवश्यकता असते. हा धागा ‘नॉन एफएक्यू’ कापसापासून तयार होतो. कपाशीच्या ‘बीटी’ वाणामुळे देशातील कापूस व त्यापासून तयार केलेल्या धाग्याचा दर्जा सुधारला असून, धाग्याची लांबी वाढली आहे. त्यामुळे पहिल्या दोन वेचणीचा कापूस लांब धाग्याचा असल्याने उर्वरित ४० टक्के कापूस हा मध्यम व आखूड धाग्याचा असतो. पंजाब व हरियाणातील कापूस आखूड धाग्याचा असून, तो टेक्सटाईल इंडस्ट्रीजची मागणी पूर्ण करण्यास पुरेसा नाही.सीसीआय केवळ दोन ग्रेडने कापसाची खरेदी करीत असल्याने खासगी व्यापारी या कापसाला फारसा भाव देत नाही. शिवाय, जिनर्स मध्यम व लांब धाग्याच्या कापसाची खरेदी करून तो कापूस लांब धाग्याच्या कापसात ‘मिक्स’ करून तयार केलेल्या गाठी तयार करून टेक्सटाईल इंडस्ट्रीजला पुरवितात. टेक्सटाईल इंडस्ट्रीजला धागा तयार करताना या कापसाची विभागणी करणे कठीण जाते. त्यामुळे नाईलाजास्तव आखूड धाग्याचा कापूस परदेशातून आणावा लागतो, अशी माहिती टेक्सटाईल इंडस्ट्रीजमधील एका अधिकाºयाने खासगीत बोलताना दिली.कापूस कैफियत आंदोलनसीसीआयने कापूस खरेदी सुरू करून ‘नॉन एफएक्यू’ कापसाची खरेदी करावी, यासाठी शेतकरी संघटनेच्याच्या वतीने गुरुवारी (दि. ३०) कापूस कैफियत आंदोलन करण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आंदोलन करणे शक्य नसल्याने लोकप्रतिनिधींना फोन व मेसेज करून कैफियत मांडली जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.भारतात नॉन एफएक्यू कॉटन इंडस्ट्री सेट होऊ शकते. त्यासाठी सरकारने काही जिन किरायाने घेऊन ‘नॉन एफएक्यू’ कापसाची खरेदी करायला पाहिजे. त्यासाठी काऊंट नंबर सिस्टिम सेट करणे आवश्यक आहे. कापूस खरेदी करताना अवेअरनेस जिनर्समध्ये नाही.विजय निवल, संचालक,पार्वती कॉटेक्स, यवतमाळ.

 

टॅग्स :cottonकापूस