शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेची हमी कोण देणार?

By admin | Updated: August 23, 2016 02:19 IST

लांब पल्याच्या मार्गावर रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस यात वाढही होत

नागपूर : लांब पल्याच्या मार्गावर रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस यात वाढही होत आहे. मात्र, रविवारी रात्री कोल्हापूरहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसचे सोलापुरात झालेल्या अपहरणाच्या घटनेने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरटीओ कार्यालयांमध्ये प्रवाशांच्या अशा सुरक्षेला घेऊन कुठलेही नियम नाहीत. ट्रॅव्हल्स बस कंपनीकडे प्रवाशांना सुरक्षा पोहचविण्याची यंत्रणा नाही. रात्रीच्यावेळी महामार्गावर पोलिसांची गस्तही फार कमी राहत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोलापूर येथील बाळे पुलावरून खासगी बस पळवून नेताना आरोपींना पोलिसांनी पकडल्याचा किस्सा ताजा असताना या घटनेची पुनरावृत्ती रविवारी रात्री घडली़ कोल्हापूरहून नागपूरकडे जाणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्स बसच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. सोलापूर- तुळजापूर मार्गावरील तामलवाडीजवळ हा प्रकार घडला. दरम्यान बस पळवून नेणाऱ्या एकास ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलिसांच्या हवाली केल्याने मोठा अनर्थ टळला. या दोन घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच मार्गावर रात्रीच्यावेळी एका स्लीपर कोच बसच्या मागील काचावर दगड मारला होता. परंतु चालकाने बस न थांबविता पुढे नेल्याने धोका टळल्याची माहिती आहे. या मार्गावर नेहमी घडतात घटना ज्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस रात्रीच्यावेळी धावतात त्यांना याविषयी बोलते केले असता त्यांनी सोलापूर रोड, जालना रोड, हिंगोली-परभणी रोड, इंदोरा-परतवाडा रोड, बैतुल रोड व जबलपूर रोड आदी मार्गावर नेहमीच छोट्या-छोट्या घटना होत असल्याचे सांगितले. या मार्गावर पोलिसांची गस्त वाढविल्यास प्रवासी सुरक्षित राहतील, असेही ते म्हणाले. नागपुरातील ३० प्रवासी सुखरूप कोल्हापूरहून नागपूरकडे येणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्स आराम बसचा रविवारी रात्री अपहरणाचा प्रयत्न झाला असलातरी नागपुरातील ३० प्रवासी सुखरूप परतले.एम़ एच़ ४०/ए.टी.०१८७ क्रमांकाची ही बस सोमवारी उशीरा नागपुरात पोहचली. बसची समोरची काच आणि मागच्या खिडकीची काच फुटलेली होती. अपहरणकर्त्याने बसच्या मागील खिडकीवर दगड मारल्याने काच फुटून एक प्रवासी जखमी झाला होता. त्याच्यावर रात्रीच प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती खुराणा ट्रॅव्हल्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘ब्लॅक स्पॉट’वर हवी पोलिसांची गस्त ज्या मार्गावर रात्रीच्यावेळी नेहमीच अनुचित घटना घडतात त्या ‘ब्लॅक स्पॉट’वर पोलिसांची गस्त असायला हवी. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे, आमच्या चालकांना यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळेच रविवारी मोठा अनर्थ टाळता आला. -राणा तिलकराम खुराणा व तुषार खुराणा संचालक, खुराणा ट्रॅव्हल्स मोटार वाहन कायद्यात तरतूद नाही वाहनांचा आकार, योग्यता, सोयी, चालक आदींबाबत मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे. मात्र प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेसंदर्भात तरतूद नाही. असे असलेतरी ज्या मार्गावर नेहमीच अशा अनुचित घटना घडतात त्याची माहिती पोलिसांना दिली जाईल. -शरद जिचकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण