शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचा झेंडा फडकणार?

By admin | Updated: September 22, 2014 00:54 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी

नागपूर विद्यापीठ : निवडणुकांमुळे महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये चुरसनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी तर २९ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन सचिवांची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांबाबत अद्यापही ‘सस्पेन्स’ कायमच आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार महाविद्यालयीन सचिवांचा निवडीसाठी २९ सप्टेंबरला निवडणुका होतील. त्यातून निवड झालेल्या सचिवांतून विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात येईल. ही निवड आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यापीठाने विलंबाने वेळापत्रक तयार केले व महाविद्यालयांमध्ये सचिव निवडीसाठी पत्र पाठविले आहे. त्यानुसार २३ सप्टेंबरपर्यंत ‘सीआर’ निवडीची प्रक्रिया करून त्यातून महाविद्यालयीन प्रतिनिधीसाठी २९ सप्टेंबरला निवडणुका घेण्यात येईल. यात आठ रोटेशनमध्ये असलेल्या महाविद्यालयांचाही समावेश आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या सचिवांचे अर्ज ७ आॅक्टोबरपर्यत पाठवायचे आहे. त्यातून सात नामनिर्देशित सदस्यांची नावे निवडल्या जातील. कुठे उत्साह, कुठे शांतताविद्यार्थी संघटनांच्या अस्तित्वाची लढाई असलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत बरीच धामधूम असते. महाविद्यालय स्तरावर अधिकाधिक विद्यार्थी प्रतिनिधी निवडुन आणण्यासाठी संघटना प्रयत्नरत असतात. विद्यार्थी परिषदेवर आपला झेंडा लावण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एनएसयुआय आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद यांच्या चुरस असते. यंदा संघटनांतील अनेक कार्यकर्ते विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे काही संघटनांमध्ये प्रचंड उत्साह तर कुठे शांतता असे वातावरण दिसून येत आहे. (प्रतिनिधी)पारदर्शक होणार निवडणुकानिवडणूक प्रक्रियेला पारदर्शक करण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुप कुमार यांनी निवडणूक निरीक्षण समिती तयार केली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर सचिव डॉ.धनंजय वेळूकर हे आहेत. व्यवस्थापन परिषद सदस्य महेंद्र निंबर्ते व डॉ.अर्चना नेरकर यांचादेखील यात सदस्य म्हणून समावेश आहे. विद्यार्थी व संघटना विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या या निवडणुकांशी संबंधित तक्रारी या समितीकडे करू शकतात. राज्यात पहिल्यांदाच निवडणूक निरीक्षण समितीची जबाबदारी इतक्या मोठ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.