शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झाले कुणाचे? दुसऱ्या दिवशीही शोध नाही

By admin | Updated: July 18, 2014 00:58 IST

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही.

अचलपुरातील अपहरण प्रकरण : पोलिसांची तपास मोहीम सुरूचअचलपूर (अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही. त्यामुळे अपहरण झाले कुणाचे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांचे तपासचक्र सुरुच आहे. दुपारपर्यंत पोलिसांनी एकूण ६४ मारोती व्हॅनची तपासणी केली होती. अचलपूर येथील व्यंकटेश विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ६४ व्हॅनची तपासणीपांढऱ्या रंगाच्या मारोती ओमनी व्हॅनमधून बुरखाधारी इसमांनी तीन मुलींना चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी मुलींनी सांगितल्यानुसार ६४ मारोती ओमनी कारची तपासणी केली. परतवाड्यात २९, पथ्रोट १२, आसेगाव ७, अचलपूर ११ व सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत १० वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मारोती व्हॅनच्या याद्या पोलिसांनी परिवहन विभागाकडून बोलाविल्या. तोंडावर दुपट्टा बंदीपरतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीतील मुलींच्या तोंडाला स्कार्फ बांधण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज शहरात पोलिसांनी चौकाचौकात, रस्त्यावर उभे राहून मुलींना तोंडाला दुपट्टा बांधण्यास मनाई केली. शाळा-महाविद्यालयांपुढे बंदोबस्तशाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या वेळेवर दोन्ही शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात आहे. घटनेने सर्वत्र संभ्रमज्या मुलींनी हा प्रकार बघितला त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी आतापर्यंत तपास कामात कुठलीच कुचराई केली नाही. सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. सीमारेषेवर पोलिसांना तैनात करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांची अंतर्गत सुरक्षा वाढविण्यात आली. तरीही अपहरण अखेर झाले कुणाचे हा संभ्रम कायम आहे. या घटनेने पालक मात्र आपल्या पाल्यांविषयी जास्त सतर्क झाल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)