शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

झामरे गेला तरी कुठे ?

By admin | Updated: May 14, 2014 14:18 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणारा महाठग जयंत प्रभाकर झामरे हा बिनधास्त शहरात वावरत असताना तो समन्स आणि वॉरंट बजावणाऱ्या पोलिसांना मात्र गवसत नसल्याची माहिती आहे.

७0 प्रकरणातील समन्स व वॉरंट परत: पोलिसांना का दिसत नाही ?

 

 

गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक करणारा महाठग जयंत प्रभाकर झामरे हा बिनधास्त शहरात वावरत असताना तो समन्स आणि वॉरंट बजावणाऱ्या पोलिसांना मात्र गवसत नसल्याची माहिती आहे. ही धक्कादायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

चेक बाऊन्स प्रकरणी अनेकांनी झामरेविरुद्ध ‘निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अँक्टच्या १३८ कलमांतर्गत खटले भरले आहेत. जवळपास ७0 प्रकरणात विशेष न्यायालयाने झामरेविरुद्ध समन्स आणि वॉरंट जारी केले आहेत. पोलीस समन्स व वॉरंट घेऊन झामरेच्या घरी जातात परंतु तो गवसला नसल्याचे कारण नमूद करून परत येतात. अर्थात या दोन्ही आदेशांची अंमलबजावणीच होत नाही. ‘क्रेडिट’ आर्थिक गुन्हे पथकाने घेतली होती. या घोटाळ्याचा तपासही योग्यरीत्या झाला नसल्याचेही बोलले जात आहे.

 

शहरात बिनधास्त वावरणारा झामरे पोलिसांना कसा काय गवसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. झामरे हा समन्स किंवा वॉरंट घेऊन येणार्‍या पोलिसांचे हात ओले करून पाठवित असल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे. सध्या जयंत आणि त्याची पत्नी वर्षा झामरे जामिनावर बाहेर आहेत. त्याच्यांविरुद्ध २२ मे २0१२ रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ४0९, ४२0, १0९, ३४ आणि महाराष्ट्र ठेवीदाराचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. २९५ गुंतवणूकदारांच्या दाखल तक्रारीनुसार या दाम्पत्याने १४ कोटी रुपयांनी ही फसवणूक केलेली आहे.

 

या दाम्पत्याने २0१0 मध्ये जे.एस. कॅपिटल सर्व्हिसेस आणि जे. एस. फायनान्शियल सर्व्हिसेस, या नावाने गुंतवणूक कार्यालये उघडून दर महिन्याला पाच ते सहा टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. प्रत्यक्षात फसल्या गेलेले गुंतवणूकदार ४00 च्या घरात असून त्यांची रक्कम २0 कोटींच्या वर आहे. गुंतवणुकीत अनेकांचा काळा पैसा असल्याने आयकर चौकशीच्या जाचामुळे त्यांनी पोलिसात तक्रारच नोंदवलेली नाही. काही महिने नियमित व्याज देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादित केला. त्यानंतर अचानक आपल्या कार्यालयांना कुलूप ठोकून हे दाम्पत्य फरार झाले होते. वर्षा झामरे हिला नाशिक येथे ३१ मे २0१२ रोजी अटक करण्यात आली होती. जयंत हा प्रत्यक्षात वाडी भागात ३0 जुलै २0१२ रोजी पोलिसांना शरण आला होता. परंतु सापळा रचून त्याला अटक केल्याचे