शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

महिन्याला १३०० पोती गेली कुठे? अधिकाऱ्यांचे तोंड बंदच ! नागपूरमध्ये गरिबांच्या हक्काचे धान्य चोरीला

By नरेश डोंगरे | Updated: October 17, 2025 20:22 IST

रेशन कार्डचाही घोळ : दलालांच्या माध्यमातून येताहेत प्रकार उजेडात, टीममधील बडा खिलाडी आहे तरी कोण?

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरिबांच्या ताटात अन्न वाढण्यासाठी सरकारने रेशन व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र, यंत्रणेला पोखरणारी मंडळी 'काळे कारनामे' करून महिन्याला तब्बल १३०० पोती धान्य गडप करतात. खुल्या बाजारात या धान्याची पद्धतशीर विल्हेवाट लावून त्यातून लाखो रुपये गिळंकृत केले जाते. 'लोकमत'ने अन्न पुरवठा विभागातील घुसखोरीवर उजेड टाकणारी खळबळजनक मालिका सुरू केल्यानंतर यात 'दाल में कुछ काला नव्हे तर डाळच काळी' असल्यासारखा धक्कादायक प्रकारवजा माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात असलेल्या साडेसहाशेपेक्षा जास्त रेशन दुकानदारांना त्यांच्याकडे असलेल्या कार्ड धारकांच्या संख्येनुसार रेशनचा कोटा मिळतो. त्यात प्राधान्य आणि अंत्योदय अशा दोन योजनांच्या वेगवेगळ्या रेशन कार्डचा समावेश असतो. धान्याचा कोटाही वेगळा असतो. या कार्डच्या माध्यमातूनही है प्रकार केले जात असल्याचे सांगितले जाते. वेगवेगळे दडपण आणून अनेक इमानदार दुकानदारांनासुद्धा ठरलेल्या कोट्यापेक्षा सरासरी दोन बोरी (पोते) धान्य कमी मिळत असल्याची ओरड आहे. 

गब्बर यंत्रणेच्या विरोधात गेल्यास रोजीरोटीवर वरवंटा फिरू शकतो, हे ध्यानात असल्यामुळे दुकानदार भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जात नाही. दरम्यान, दुकानदारांची संख्या आणि प्रत्येकाची दोन मोती असा ढोबळमानाने हिशेब केल्यास महिन्याला १२०० ते १३०० बोरी धान्य गडप होते. या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी भ्रष्ट मंडळींनी रेशन माफियांची एक भली मोठी टीम निर्माण करून ठेवल्याचीही माहिती आहे.

दलालांची समांतर वखार व्यवस्था

संबंधित सूत्रानुसार, या टीममध्ये या रॅकेटमधील आधीचा बडा खिलाडी मानला जाणाऱ्या वेतनचे काम आता भद्राने हाती घेतले आहे. त्याची गोदामं वेगवेगळ्या भागात आहेत. विक्कीचे गोदाम कळमना भागानजीक, रितेशचे गोदाम फिरते, सोनूचे कामती मार्गावर बबलूचे हसनबाग, ताजबागेल तर स्वीचे जरीपटक्यात गोदाम आहे. वितरण प्रणालीतून गोलमाल केलेले कोट्यवधीचे अनाज या वेगवेगळ्या गोदामात साठवले जाते.

गोरगरिबांसह सरकारलाही चोट

नमूद भागासह शहराच्या बाहेरही काही माफियांची गोदामं आहेत. या सर्व गोदामातून वसा-रात्री गोलमाल केलेल्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार केला जातो. अशाप्रकारे अन्न पुरवठा यंत्रणेतील झारीचे शुक्राचार्य एकीकडे गरिबाच्या ताटातील अन्न हिसकावून घेतात. दुसरीकडे प्रामाणिक रेशन दुकानदारांना धाक दाखवून त्यांचाही कॉडमारा करतात आणि तिसरीकडे स्वतःची तुंबडी भरण्यासाठी सरकारलाही चोट देतात, अशी माहिती आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Poor's ration stolen; 1300 sacks vanish monthly!

Web Summary : In Nagpur, a massive ration scam deprives the poor. Thirteen hundred sacks of subsidized grain disappear monthly, sold on the black market. Corrupt officials and ration mafias are implicated, exploiting the system and threatening honest shopkeepers for profit, while authorities stay silent.
टॅग्स :nagpurनागपूरGovernmentसरकार