शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

चाैरस्त्यावर उपाययाेजना करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरालगतच्या चाैरस्त्यावर अपघात टाळण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. दाेन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात कंटेनरचालकाचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरालगतच्या चाैरस्त्यावर अपघात टाळण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना करण्यात आल्या नाहीत. दाेन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या ठिकाणी उपाययाेजना करणे अपेक्षित असताना तिथे प्रशासनाने साधा दिशादर्शक फलक देखील लावला नाही. या ठिकाणी हाेणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गाेंडखैरी-कळमेश्वर-सावनेर मार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामाचे कंत्राट दिलीप बिल्डकाॅन नामक कंपनीला दिले आहेत. या मार्गावरील चाैरस्त्यावर दाेन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात पप्पू रा. हाथरस (उत्तर प्रदेश) या कंटेनरचालकाचा मृत्यू झाला. ताे एचआर-४७/डी-७०८४ क्रमांकाच्या कंटेनरने गोंडखैरीहून सावनेरकडे जात होता. याच मार्गावर सेलू (ता. कळमेश्वर) शिवारात कळमेश्वर-सावंगी मार्गावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे.

त्या ठिकाणी कंत्राटदार कंपनीने दिशादर्शक फलक लावले नसून, सर्व्हिस अथवा बायपास राेडही तयार केला नाही. त्यामुळे हा कंटेनर निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामात फसला आणि चालक कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. पाेलिसांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर या ठिकाणी उपाययाेजना करणे गरजेचे हाेते. मात्र, कंत्राटदार कंपनीने त्या ठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकून मार्ग बंद करण्याशिवाय काेणत्याही उपाययाेजना केल्या नाही. दुसरीकडे, या ठिकाणी दिशादर्शक फलक लावून याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.