शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कर्मचाऱ्यांना जेव्हा तुकाराम मुंढे स्वत: फोन करतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 7:00 AM

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देआपात्कालीन परिस्थितीवर ३६०० कॅमेऱ्यांची नजर‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’सह यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. जोराचा पाऊस झाल्यास तक्रारी किंवा मदतीसाठी कॉल्स येऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या कॉल्सची वाट न पाहता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दुपारी स्वत: ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’ गाठले. सेंटरमधील स्क्रीनवर शहरातील परिस्थितीची पाहणी केली. ज्या ठिकाणी समस्या दिसली त्या तातडीने सोडविण्यासाठी स्वत: कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महापालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. तसेच प्रसंगी उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.रविवारी शहरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मुसळधार पाऊस आला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर गाठायला लावले. कॅमेºयाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी समस्या दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

तुकाराम मुंढे यांनी लाईव्ह फुटेजवरून ज्या ठिकाणी समस्या दिसली तेथे तातडीने संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना पाठविले. स्वत: मोबाईलवरून संपर्क साधत परिस्थिती जाणून घेतली. पुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी काय करायला हवे, याबाबत त्यांनी त्या कर्मचाºयाकडूनच माहिती घेत त्याप्रमाणे कार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील आपात्कालीन परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी मनपाद्वारे झोन स्तरावर विविध टीम गठित करण्यात आल्या आहेत.तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरावर भरशहरातील ज्या समस्या आहे, त्या सोडविण्यासाठी आता उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. मनपा मुख्यालयात उभारण्यात आलेले सिटी ऑपरेशन सेंटर हे केवळ अपघातावर नियंत्रण किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही तर मनपाची यंत्रणा अधिक सक्षम बनविण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. सफाई कामगारांच्या कार्यावर आणि स्वच्छतेवर नजर ठेवण्यात येत असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे