शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

'गुलाल उधळल्यावर कसली तपासणी?'; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:26 IST

Nagpur : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत.

नागपूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. शासनाने जेव्हा जीआर (GR) दिला, तेव्हा जरांगे पाटलांनी गुलाल उधळत आपण लढाई जिंकल्याचे जाहीर केले होते; मग आता पुन्हा आंदोलनाची भाषा का?" असा रोखठोक प्रश्न तायवाडे यांनी विचारला आहे.

​'सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध'

बबनराव तायवाडे यांनी ओबीसी महासंघाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही आमच्या मागणीवर आजही ठाम आहोत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. ज्यांच्याकडे कुणबी असल्याबाबातचे जुने पुरावे मिळाले आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, आंदोलनांच्या दबावाखाली जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला किंवा अधिक लोकांना नियमबाह्य पद्धतीने ओबीसीमध्ये समाविष्ट केले गेले, तर आम्हीही शांत बसणार नाही. ओबीसी समाज या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देईल.

​१९९४ च्या निर्णयाचा दाखला आणि ७ आयोगांचे संदर्भ

​जरांगे पाटील यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या दाखल्यांवर बोलताना तायवाडे म्हणाले, "१९९४ चा निर्णय राज्य मागासवर्गीय आयोगाने दिला होता. ज्यांच्या नोंदी 'कुणबी' किंवा 'कुणबी मराठा' अशा होत्या, त्यांना मागास ठरवून ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस झाली होती. ते मुळात कुणबी असल्याने त्याला तेव्हा कोणीही विरोध केला नव्हता. मात्र, ज्यांच्या प्रमाणपत्रावर निव्वळ 'मराठा' लिहिले आहे, त्यांना ओबीसीत यायचे असेल तर मागासवर्गीय आयोगाची शिफारस अनिवार्य आहे. आजवर यासाठी ७ आयोग नेमले गेले, पण अशी शिफारस कोणत्याही आयोगाने केली नाही. त्यामुळे आता १९९४ च्या निर्णयाचा दाखला देणे चुकीचे आहे.

​जरांगे पाटलांना सल्लागार म्हणून बसवावं लागेल

​शासनाच्या जीआरवर बोलताना त्यांनी टोला लगावला की,aa "जीआर निघण्यापूर्वीच कागदपत्रांची आणि कायदेशीर बाबींची तपासणी करायला हवी होती. जीआर काढण्याच्या दोन तास आधी त्यावर अभ्यास करून, बदल करून गुलाल उधळला गेला. आता गुलाल उधळल्यावर कसली तपासणी करता? सरकारच्या उपसमितीने कसे काम करावे, हे जर आंदोलनकर्तेच ठरवणार असतील, तर जरांगे पाटील यांना थेट मंत्रिमंडळ समितीमध्ये सल्लागार म्हणूनच बसवावे लागेल.

​शेवटी, त्या  जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही, हे मी आजही तितक्याच जबाबदारीने सांगतो,असे स्पष्ट करत ओबीसी महासंघ आपल्या हक्कांसाठी सातत्याने बैठका आणि जनजागृती करत राहील, असा विश्वास तायवाडे यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Why check after celebration?: Taywade questions Jarange Patil's renewed agitation.

Web Summary : Babanrao Taywade questions Jarange Patil's renewed agitation after celebrating the GR victory. He opposes blanket OBC certificates for Marathas, allowing them only with Kunbi records. He warns against impacting OBC reservations, referencing past commission reports, and suggests Patil should advise the government directly.
टॅग्स :Babanrao Taywadeबबनराव तायवाडेnagpurनागपूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील