शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काय करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला आहे. दरम्यान, न्यायालयाने बुधवारी या ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सारस पक्ष्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा अतिशय गंभीरतेने घेतला आहे. दरम्यान, न्यायालयाने बुधवारी या दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार काय करीत आहे, अशी विचारणा केली, तसेच यावर तीन आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावर्षी गोंदिया येथील सेवा संस्थेने वन विभागाच्या मदतीने १३ ते १६ जून या कालावधीत गोंदिया व भंडारासह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये सारस पक्ष्यांची गणना केली. त्यासाठी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात २३ तर, बालाघाट जिल्ह्यात २१ पथके तयार करण्यात आली हाेती. या गणनेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ सारस पक्षी कमी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या भागात सारस पक्ष्यांची संख्या घटून ८८ झाली आहे. महाराष्ट्रामधून माळढोक पक्षी पूर्णपणे नामशेष झाले आहेत. आता प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा सारस पक्षीसुद्धा दुर्मिळ झाला आहे. विदर्भामध्ये सध्या केवळ गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात या पक्ष्याचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. ॲड. राधिका बजाज यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

--------------

संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा मुद्दा

सारस पक्ष्यांची संख्या कमी होणे हा केवळ विदर्भासाठी नाही तर, संपूर्ण देशाकरिता पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले होते.