शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांमधील ठेवींचे काय?

By admin | Updated: May 25, 2014 01:00 IST

जिल्हा बँकेवर अवसायक नियुक्त करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकार खात्याला दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर पूर्णत: निर्बंंंंध आले आहे. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांना फक्त एक

आर्थिक व्यवहारावर निर्बंंंध : हवी रोख मदत

मोरेश्‍वर मानापुरे - नागपूर

जिल्हा बँकेवर अवसायक नियुक्त करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकार खात्याला दिल्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारावर पूर्णत: निर्बंंंंध आले आहे. त्यामुळे खातेदार व ठेवीदारांना फक्त एक हजारापेक्षा जास्त रक्कम विड्राल करण्यावर बंधन आले आहे. आर्थिक परवान्याचा तिढा लवकरच न सुटल्यास याआधी नागपुरात बंद पडलेल्या नागरी बँकांमधील ठेवींप्रमाणे जिल्हा बँकेतील ठेवी बुडणार तर नाही ना? असा प्रश्न ठेवीदारांना सतावत आहे.

बँकेच्या ८६ शाखा आहेत. सर्वच शाखांमध्ये खातेदार आणि ठेवीदार गर्दी करू लागले आहेत. त्यांची समज घालताना अधिकार्‍यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटल्यास अधिकार्‍यांना त्यांना समजावणे कठीण जाईल. अधिकार्‍यांना संरक्षण देण्याची बँकेच्या कर्मचारी असोसिएशनची मागणी आहे. रिझर्व्ह बँकेला शासनाची कागदोपत्री हमी नको. शासनाने मदतीच्या स्वरूपात बँकेच्या खात्यात तातडीने रोख रक्कम जमा करणे, हाच अंतिम पर्याय आहे. आर्थिक परवाना मिळविण्यासाठी बँकेला हवी असलेली रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलायची हवी. त्यानंतरच रिझर्व्ह बँक जिल्हा बँकेच्या आर्थिक परवान्यावर गांभीर्याने विचार करू शकेल. यासाठी शासनाची इच्छाशक्ती हवी, असे मत अर्थतज्ज्ञाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

खातेदार व ठेवीदारांना हवी

बँकेची स्थिती नाजूक असल्याने ३१ मे २0१४ नंतर खातेदार आणि ठेवीदारांना रक्कम काढता येईल, असा मोठय़ा अक्षरातील नोटीस बँकेबाहेर आणि बँकेच्या आत प्रत्येक माळ्यावर झळकत होता. आज ना उद्या बँक सुस्थितीत येईल आणि रक्कम परत मिळेल, असा ग्राहकांना विश्‍वास होता. पण जसे दिवस जात आहेत, तसा त्यांचा तोल सुटत चालला आहे. कुणाला पाल्याच्या शाळेची वा कॉलेजची

फी’साठी रक्कम‘फी’ भरायची आहे तर कुणाला मुलाचे वा मुलीच्या लग्नासाठी तर काहींना उपचारासाठी रक्कम हवी आहे. शासनाकडून लवकरच मदत मिळेल आणि बँक ताळ्यावर येईल, त्यानंतरच सर्वांंंना रक्कम मिळेल, असे आश्‍वासन अधिकारी खातेदार व ठेवीदारांना देत आहेत.