शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

- हा तर गुंतवणूकदारांना फसविण्याचा सुनियोजित कट

By admin | Updated: December 23, 2015 03:42 IST

वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली,

हायकोर्टाचा निष्कर्ष : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा घोटाळानागपूर : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने एका सुनियोजित कटांतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केली, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भाग्यश्री वासनकर, विनय वासनकर व अभिजित चौधरीचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविला आहे. शासनाच्या प्रतिज्ञापत्रानुसार कंपनीने गुंतवणूकदारांची १५९ कोटींवर रुपयांनी फसवणूक केली आहे. आरोपींनी आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास आकर्षित केले. ही सुनियोजित कटाची सुरुवात होती. नागरिक या जाळ्यात फसले. आरोपींनी ३० ते ६० टक्के परताव्याचे वचन देऊन नागरिकांकडून पैसे गोळा केले. हा परतावा प्रचलित दरापेक्षा अधिक आहे. यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना फसविण्यासाठीच हा कट रचला होता, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा वाव असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पोलीस कारवाईचा संशय आल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून सर्व रक्कम दुसरीकडे वळती केली. यानंतर पोलिसांना कंपनीच्या खात्यांमध्ये ३७८, ३४३, १३८९, ३१३८, २४,००० अशी किरकोळ रक्कम आढळून आली. या सर्व खात्यांमध्ये सुरुवातीला मोठी रक्कम होती. मार्च व जून महिन्यात ५१ कोटी ५८ लाख ५ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीकडे स्थानांतरित करण्यात आले. अर्जदारांना जामिनावर सोडल्यास ते या रकमेपर्यंत पोहोचतील व अशावेळी थेट गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होईल. यामुळे अर्जदारांना जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ‘निम्मगड्डा प्रसाद वि. सीबीआय’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयांनी आरोपाचे स्वरूप, आरोपाच्या समर्थनासाठी सादर पुराव्यांचे स्वरूप, गुन्ह्यातील शिक्षेची तीव्रता, आरोपींचे व्यक्तिमत्त्व, आरोपींच्या विरोधातील परिस्थिती, खटल्यावरील सुनावणीदरम्यान आरोपी उपस्थित राहील याची शक्यता, साक्षीदार प्रभावित होण्याचा धोका, जनहित व इतरही काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या टप्प्यावर शासनाने आरोपीविरुद्ध संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करणे अपेक्षित नसते. परंतु गुन्ह्याबाबत प्राथमिक पुरावे सादर करणे आवश्यक आहे. आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीतही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. विचारपूर्वक कट रचून केलेल्या आणि सार्वजनिक निधीचे प्रचंड मोठे नुकसान करणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे. देशाची अर्थव्यवस्था प्रभावित करणारे गुन्हे म्हणून याचा विचार करायला पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित निर्णयात म्हटले आहे.