शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरआय’कडून ‘ट्रम्प’ विजयाचे स्वागत

By admin | Updated: November 10, 2016 02:56 IST

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या ‘एनआरआय’मध्ये (नॉन रेसिडेन्ट इंडियन्स) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

‘मि. प्रेसिडेंट’कडून अपेक्षा :‘व्हिसा’ नियमांत बदल नको नागपूर : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या ‘एनआरआय’मध्ये (नॉन रेसिडेन्ट इंडियन्स) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मूळचे नागपूरकर मात्र सध्या अमेरिकेत असणाऱ्या ‘एनआरआय’ने ‘मिस्टर प्रेसिडेन्ट’चे स्वागत तर केले आहे, मात्र आता ‘व्हिसा’ नियम कडक होतात की काय अशी चिंता त्यांना लागली आहे. या नियमांत बदल व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ने काही ‘एनआरआय’च्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रचाराच्या सुरुवातीला अनेक भागांमध्ये हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने भारतीय होते. मात्र प्रचार संपत येत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उधळलेली स्तुतिसुमने तसेच येथील संस्कृतीबाबत काढलेले गौरवोद्गार यामुळे स्थिती बदललेली दिसून आली. ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वादग्रस्त असले तरी जगातील सर्वात मोठ्या महासत्तेचे ते राष्ट्राध्यक्ष झाले असून याबाबत त्यांचे स्वागत करायलाच हवे, अशी भावना ‘एनआरआय’कडून व्यक्त करण्यात आली. अमेरिकेत रोजगारासाठी जाण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एच१बी’ व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचा मानस ट्रम्प यांनी व्यक्त केला होता. अमेरिकेतील ‘आयटी’ कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत. मात्र अमेरिकेतील तरुणांना अगोदर प्राधान्य मिळावे यासाठी ‘व्हिसा’ नियमांमध्ये बदल होतात की काय अशी चिंता वाटते आहे. नियम कठोर झाले तर अनेक ‘एनआरआय’ला परतावे लागू शकते. शिवाय कंपन्यांचेदेखील नुकसान होईल. त्यामुळे ‘व्हिसा’चे नियम आहे तसेच रहावे, अशी अपेक्षा एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असणारे योगेश नेमाडे यांनी व्यक्त केली.‘एनआरआय’च्या नातेवाईकांमध्ये दिसली उत्सुकतानागपुरातील अनेक तरुण अमेरिकेत नोकरीसाठी स्थायिक झाले आहेत. ही संख्या हजारांच्या घरात आहे. त्यामुळे अशा ‘एनआरआय’च्या कुटुंबीयांची नजर सकाळपासूनच इंटरनेट व दूरचित्रवाणी संचांवर खिळली होती. डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांच्यापैकी नेमके कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता होती. (प्रतिनिधी)