शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निवडणूक काळात १६९ आरोपींकडे आढळली शस्त्रे; १० पिस्तुल, ९३ चाकू, २४ तलवारी जप्त

By योगेश पांडे | Updated: May 18, 2024 22:03 IST

दोन महिन्यात १०.८३ लाखांची दारू तर ९९.४८ लाखांचे ड्रग्ज जप्त

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: लोकसभा निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता असताना नागपुरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली. दोन महिन्यातच १६९ आरोपींकडून शस्त्रे जप्त करण्यात आली व त्यात १० पिस्तुलांचादेखील समावेश होता.

१६ मार्च ते १७ मे या कालावधीत पोलिसांनी दारू, ड्रग्जविरोधात मोहीमच राबविली होती. सर्व पोलीस ठाण्यातील पथकांना कडक तपासणी करण्याचे निर्देश होते. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत ४७६ गुन्हे दाखल करण्यात आले व ५०९ आरोपींवर कारवाई झाली. त्यांच्याकडून १०.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय एनडीपीएस कायद्याअंतर्गत ३४ प्रकरणांत ६२ जणांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून ९९.४८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर एमडी पावडरचादेखील समावेश होता.

९३ चाकू व २४ तलवारी जप्त

पोलिसांनी दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय शस्त्र अधिनियमाअंतर्गत १५७ गुन्ह्यांमध्ये एकुण १६९ आरोपींवर कारवाई केली. या आरोपींकडून १० पिस्तुले १९ काडतूसे, ९३ चाकू, ९ कोयते, २४ तलवारी, ३ भाले, एक गुप्ती अशी १५.७५ लाखांची शस्त्रे जप्त करण्यात आली.

- १३ जणांवर एमपीडीएची कारवाई

या कालावधीत १३ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली व त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. त्याचप्रमाणे तहसील, अजनी, कपिलनगर व यशोधरानगर येथील ४ गुन्ह्यांत मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करत २२ गुन्हेगारांवर मकोका लावण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४