शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल सीडीआर आम्हीच दिले

By admin | Updated: April 10, 2015 02:18 IST

नागपूर शहर गुन्हे शाखेने केलेल्या मागणीनुसार आम्ही मोबाईल सीडीआर उपलब्ध करून दिले. न्यायालयात दाखविण्यात आलेले सीडीआर आम्हीच दिलेले आहेत, ...

नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेने केलेल्या मागणीनुसार आम्ही मोबाईल सीडीआर उपलब्ध करून दिले. न्यायालयात दाखविण्यात आलेले सीडीआर आम्हीच दिलेले आहेत, अशी साक्ष दोन वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या युग चांडक हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिली. पुणेच्या बीएसएनएल येथे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर असलेले गोकुळ रसाळ हे आपली साक्ष देताना म्हणाले की, नोव्हेंबर २०१४ मध्ये आपण नोडल आॅफिसमध्ये काम करीत असताना नागपूर शहर गुन्हे शाखेने एका बीएसएनएलच्या मोबाईल नंबरचा सीडीआर मागितला. आमचे सिनियर माळी यांनी आपल्या सहीनिशी सविस्तर सीडीआर दिला. न्यायालयात दाखवण्यात आलेला सीडीआर आपणच दिलेला असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथीलच व्होडाफोनचे नोडल आॅफिसर फ्रान्सिस फरेरा यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, सप्टेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान आपणास वेगवेगळ्या तीन व्होडाफोन मोबाईलच्या क्रमांकाचे सीडीआर मागण्यात आले. एक मोबाईल संदीप कटरेच्या नावाचा होता. सीडीआर दिल्यानंतर आम्ही भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब अन्वये प्रमाणपत्रही दिल्याचे फरेरा यांनी सांगितले. गुरुवारी त्यांची साक्ष अर्धवटच राहिली. ती उद्या शुक्रवारीही राहील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी मुकेश चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींचे वकील अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय, अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय, अ‍ॅड. राजेश्री वासनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)