नागपुरात ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:49 IST2019-06-15T21:45:11+5:302019-06-15T21:49:05+5:30
नागपूर जिल्ह्यात येत्या ३० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाण्याचा साठा आहे. पाऊस उशिराने येण्याची शक्यता लक्षात घेता आणि जलशयांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी झाला असताना शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीनंतर बोलताना केले.

नागपुरात ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात येत्या ३० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाण्याचा साठा आहे. पाऊस उशिराने येण्याची शक्यता लक्षात घेता आणि जलशयांमधील पाण्याचा साठा प्रचंड कमी झाला असताना शहरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीनंतर बोलताना केले.
पाईपलाईनमधील लिकेजेस मनपा प्रशासनाने बंद करावेत. रस्त्यांचे किंवा विकासाची कामे सुरू असताना जर पाण्याची पाईप लाईन क्षतिग्रस्त झाल्यास लगेच दुरुस्त करावी. पाणी वाया जाऊ देऊ नये. पिण्याचे पाणी कुणालाही कमी पडणार नाही. पण नैसर्गिक पाण्याचे स्रोत उदा. विहिरी, विंधन विहिरींचे पाण्याचा उपयोग वापरण्यासाठी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.