शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंड लॉकडाऊनमध्ये भटकंती, पोलीस बंदोबस्त नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाची साखळी आणि संसर्गावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ...

नागपूर : कोरोनाची साखळी आणि संसर्गावर नियंत्रणासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लावले आहेत. वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बाजार तर बंद होता. मात्र अनेक जण विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यांवर फिरताना दिसून आले. आश्चर्याची बाब म्हणजे जमावबंदी असतानादेखील मैदानांवर खेळ सुरू होता व मुख्य रस्त्यांवरील कट्ट्यांवर लोक एकत्रित येऊन गप्पा मारताना दिसले. विशेष म्हणजे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करू हा पोलीस आयुक्तांचा दावा हवेतच राहिला. अनेक ठिकाणी तर पोलिसांचा नावालादेखील बंदोबस्त नव्हता.

महाल, इतवारी, मस्कासाथ, गांधीबाग, सीताबर्डी, खामला, जरीपटका, सक्करदरा, कमाल चौक येथील बाजारपेठा पूर्णत: बंद होत्या. शनिवारप्रमाणे रविवारी व्यापारी बाजारपेठांमध्ये दिसले नाहीत. कळमना येथील भाजीबाजार व कॉटन मार्केट बाजारपेठेत सकाळी ९ पर्यंत भाज्यांची खरेदी-विक्री झाली. मात्र शहरातील इतर भागांत वीकेंड लॉकडाऊनचे हवे तसे पालन झाले नाही. प्रशासनाकडून दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक लोक घराबाहेर निघाले होते. विशेषत: रविवारी सकाळी ढगाळलेले वातावरण असल्याने बरेच जण तर वातावरणाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर निघाल्याचे दिसून आले. दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपुरात हे प्रमाण जास्त होते. सायंकाळी अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसले.

पोलीस बंदोबस्त कडक कधी होणार?

पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने लोकांनी विनाकारण घराबाहेर निघण्याचे टाळले होते. वीकेंड लॉकडाऊनमध्ये नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करू, असा दावा पोलीस आयुक्तांनी केला होता. प्रत्यक्षात लोक घराबाहेर निघत होते व दिवसा साधे पेट्रोलिंगदेखील दिसून आले. पोलिसांचे वाहन गेले तरी लोकांना हटकण्याची तसदी घेण्यात येत नव्हती. काही चौकात नाकाबंदी होती. मात्र लोकांची विचारपूस करण्यावर जास्त भर नव्हता. पोलीस बंदोबस्तच कडक नसल्याने स्प्रेडर्स कुठल्याही भीतीविना बाहेर फिरताना दिसून आले.