शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रोला व्हीएनआयटीचा आधार

By admin | Updated: June 12, 2015 02:53 IST

उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर मेट्रो रेल्वेला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा

महत्त्वाकांक्षी प्रकल्प : तांत्रिक सहकार्यासाठी होणार करारनागपूर : उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर मेट्रो रेल्वेला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा (व्हीएनआयटी) आधार मिळणार आहे. हा अत्यंत तांत्रिक प्रकल्प असल्यामुळे नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशनने ‘व्हीएनआयटी’चे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे.‘व्हीएनआयटी’ ही देशातील प्रतिष्ठित संस्था आहे. कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी ‘व्हीएनआयटी’चे अध्यक्ष विश्वास जामदार व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. जामदार यांनी कार्पोरेशनसोबत सामंजस्य करार करण्यास सहमती दर्शविली आहे. करारावर लवकरच स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीकरिता ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. दीक्षित यांनी प्रकल्पांची विस्तृत माहिती दिल्यानंतर प्रकल्पासंदर्भात विविध सूचना करणे, बांधकामाची गुणवत्ता व रचना, वीज यंत्रणा, सिग्नल व संचार व्यवस्था, खोदकाम अभियांत्रिकी व वास्तू नियोजन इत्यादी माध्यमाद्वारे प्रकल्पाशी जुळावे अशी विनंती ‘व्हीएनआयटी’ला केली. जामदार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘व्हीएनआयटी’ची तांत्रिक मदत उपयोगी सिद्ध होईल असे मत व्यक्त केले तर, ‘व्हीएनआयटी’चे संचालक प्रा. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या विविध विभागांतील तांत्रिक सुविधांची माहिती दिली. कुलसचिव प्रा. राजेंद्र येरपुडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील भट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. एस. आर. भिडे, आर्किटेक्चर विभाग प्रमुख डॉ. राजश्री कोठारकर, डॉ. पी. एस. कुलकर्णी, प्रा. व्ही. एस. अडाणे, प्रा. व्ही. एस. कापसे, के. एकबोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण४‘व्हीएनआयटी’ कार्यशाळा आयोजित करून नागपूर मेट्रो रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल असे प्रस्तावित आहे. मेट्रो रेल्वेस्थानकांची वास्तूरचना ठविण्याच्या प्रक्रियेतही ‘व्हीएनआयटी’ सहभागी होणार आहे. तसेच, सामंजस्य करारामुळे ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांना प्रकल्पातील तांत्रिकता समजून घेण्याची संधी मिळणार आहे.