शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: May 15, 2015 02:39 IST

केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

नागपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. केंद्रात सत्तेत आल्यानंतर राजनाथसिंग यांनी गुरुवारी सकाळी प्रथमच संघ मुख्यालयात हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या या भेटीदरम्यान दोघांमध्ये राष्ट्रीय राजकारणाशी संबंधित विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मी एक स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांची भेट घेतल्याची स्पष्टोक्ती सिंग यांनी या भेटीनंतर केली.सकाळी ११ च्या सुमारास राजनाथसिंग संघ मुख्यालयात पोहोचले. त्यांनी त्यावेळी थेट सरसंघचालकांची भेट घेतली. सुमारे दीड तास झालेल्या बंदद्वार चर्चेत सरसंघचालकांनी त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सोबतच भूमी अधिग्रहण विधेयक, छत्तीसगड व महाराष्ट्रातील नक्षल समस्या, ‘इसिस’चा संभाव्य धोका, अंतर्गत सुरक्षा व भाजपातील अंतर्गत राजकारणावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण संघाचे स्वयंसेवक असल्याने नागपूरला आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणे स्वाभाविक असल्याचे प्रतिपादन यानंतर राजनाथसिंग यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, यावेळी संघ मुख्यालय परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.त्यानंतर सिंग यांनी रविभवन येथे त्यांनी विदर्भातील ‘अ‍ॅन्टी नक्सल आॅपरेशन’चा आढावा घेतला. या वेळी सिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा यशस्वी होईल. चीनसोबत संबंध सुधारले तर सीमावाद सुटेल. पंतप्रधान देशहित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतील. पाकिस्तानमध्ये इसिसने केलेला हल्ला चिंताजनक आहे. दहशतवाद थांबविण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, अशी मागणी वेळोवेळी आपल्यातर्फे पाकिस्तानला करण्यात आली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या तेलंगणा दौऱ्याबाबत काहीही भाष्य करणे त्यांनी टाळले. कोणते सरकार आपल्या हिताचे निर्णय घेते हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असा टोला मात्र त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)