शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे बर्थसाठी ‘व्हीआयपी सेटिंग’

By admin | Updated: November 14, 2015 03:24 IST

दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तात्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे.

दयानंद पाईकराव नागपूर दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तात्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. अनेक प्रवाशांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ‘व्हीआयपी सेटिंग’ करण्यावर भर दिल्यामुळे ‘डीआरएम’ कार्यालयात येणाऱ्या व्हीआयपी कोट्याच्या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आली. एरव्ही ४ हजार येणारे व्हीआयपी कोट्याचे अर्ज १० हजारावर पोहोचल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी दिवाळी आणि शुक्रवारी भाऊबीजेचा सण आटोपल्यानंतर अनेक प्रवाशांनी आपल्या परतीच्या प्रवासाची तयारी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी नागपुरातून सर्वच दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल होत्या. मुंबई, पुण्यासह दिल्ली मार्गावरील गाड्यात ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. अनेक प्रवासी शुक्रवारी सायंकाळपर्यंत तात्काळच्या रांगेत उभे होते. तात्काळमध्येही वेटिंगचे तिकीट हाती पडल्यामुळे अनेक प्रवाशांची निराशा झाली. नागपुरातून दिवसाकाळी १०० ते ११५ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे बुधवारपासून अनेक प्रवाशांनी राजकीय नेत्यांच्या लेटरपॅडवर बर्थसाठी व्हीआयपी कोट्यात अर्ज करणे सुरू केले आहे. साधारणत: दिवसाकाठी व्हीआयपी कोट्यासाठी ४ हजाराच्या जवळपास अर्ज येतात. परंतु दिवाळी आटोपल्यानंतर या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊन १० हजाराच्या आसपास अर्ज येण्यास सुरुवात झाली. यात नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांचा कोटा बऱ्यापैकी आहे. परंतु दिल्ली, चेन्नई मार्गावरील कोटा अतिशय कमी आहे. त्यामुळे व्हीआयपी कोट्यातून नेमके कुणाला रिझर्व्हेशन द्यायचे याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक प्रवाशांनी व्हीआयपी कोट्यातून अर्ज करूनही पुरेसा कोटा नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळाला नाही. तर काही प्रवाशांना बर्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा झाला. अजून दोन दिवस व्हीआयपी कोट्यासाठी अशाच मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.