शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला हिंसाचाराचे गालबोट, उमेदवारांवरच हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हावडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हावडा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३१ जागांवर ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दिवसभरात हुगळी जिल्ह्यातील काही जागांवर हिंसेच्या घटना घडल्याने तणाव होता. बऱ्याच ठिकाणी भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. मतदानादरम्यान झालेल्या या संग्रामामुळे राजकीय वातावरणदेखील तापले होते.

सकाळच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांची गर्दी दिसून येत होती. मतदानाशी संबंधित नियमांचा भंग होत असल्याचा दावा तृणमूलतर्फे करण्यात आला. हुगळी जिल्ह्यातील हरिपाल विधानसभा क्षेत्रातील विविध बूथजवळ हिंसाचाराच्या घटना झाल्या. खालाकूल विधानसभा क्षेत्रातील जिंगरा भागात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार नजबूल करीम यांच्यावर हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले. तर आरामबाग येथील तृणमूलच्या उमेदवार सुजाता मंडल यांच्यावरदेखील हल्ला झाला. अनेक कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन त्यांच्या मागे धावले. तर नाचिंगडंगा गावात हाणामारीत भाजपचे मंडळ अध्यक्ष जखमी झाले. गोघाट विधानसभा क्षेत्रातील एका बूथवर भाजपच्या बूथ एजंट्सवर हल्ला करण्यात आला. भाजपने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला.

मतदान केंद्रात तोडफोड

हावडा येथील जगतवल्लभपूर हायस्कूलमध्ये मतदानादरम्यान तोडफोड करण्यात आली. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आयएसएफच्या बूथ एजंट्सला धमकी दिली व त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. सातसा भागातील पोलिंग बूथवर आयएसएफच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब फेकल्याचा

आरोप तृणमूलकडून करण्यात आला.

तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार

सुजाता मंडल यांच्यावरील हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असून सीआरपीएफ जवानांनी काहीच कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगाने प्रशासनाला यासंदर्भात अहवाल मागविला आहे.