लाेधा करवाही येथे गाव पंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:09 IST2021-03-10T04:09:16+5:302021-03-10T04:09:16+5:30

रामटेक : तालुक्यातील लाेधा, करवाही व वडांबा येथे गाव पंचायतीचे आयाेजन करण्यात आले. किसान सभेतर्फे आयाेजित लाेधा येथे जयप्रकाश ...

Village Panchayat at Ladha Karwahi | लाेधा करवाही येथे गाव पंचायत

लाेधा करवाही येथे गाव पंचायत

रामटेक : तालुक्यातील लाेधा, करवाही व वडांबा येथे गाव पंचायतीचे आयाेजन करण्यात आले. किसान सभेतर्फे आयाेजित लाेधा येथे जयप्रकाश वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गाव पंचायत सभा पार पडली. किसान सभेचे जिल्हा सचिव अरुण वनकर यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी कायद्यांबाबत माहिती देत, त्यामुळे हाेणारे दुष्परिणाम सांगितले. आदिवासी महासभेचे नेते नत्थू परतेती यांनी सभेचा समाराेप केला. विनाेद ढाेबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर करवाही येथे दयाराम गाेवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली अरुण वनकर, नत्थू परतेती यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्याबाबत ठराव घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वडांबा येथे बळीराम सुहागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली गाव पंचायत सभा घेण्यात आली. किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कैलास राऊत यांनी आभार मानले.

Web Title: Village Panchayat at Ladha Karwahi