शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विरोधकांना देणार निवडणूकपूर्व इशारा

By admin | Updated: September 19, 2014 00:55 IST

जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची

नागपूर : जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची सुरुवात होणार असून पवित्र दीक्षाभूमी येथे याचा समारोप होणार आहे. वेगळ््या विदर्भाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्ष व नेत्यांना विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही यात्रा म्हणजे खणखणीत इशाराच मानण्यात येत आहे.हा जनतेचा लढा असल्यामुळे या यात्रेचे नेतृत्व कोणत्याही एका व्यक्तीकडे नसेल. यात्रेच्या अग्रभागी असलेल्या रथावर जिजाऊ, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमा राहणार आहेत अशी माहिती जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर यांनी दिली. वेगळ््या विदर्भाच्या निर्मितीसाठी अनेक राजकीय पक्ष किंवा नेते इच्छुक नाहीत. जनमानसाच्या भावनांचा सातत्याने अनादर करणाऱ्या या पक्षांसाठी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही यात्रा म्हणजे इशाराच राहणार आहे. विदर्भाला विरोध करणाऱ्या पक्ष व नेत्यांना मतदान करू नये ही भूमिका या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.तीन हजारांहून अधिक लोक सहभागी होणारसिंदखेडराजा येथून सुरुवातीला विदर्भाच्या अकरा जिल्ह्याची प्रत्येकी एक अशा ११ गाड्या निघणार आहेत. त्यानंतर ठिकठिकाणच्या टप्प्यांवर निरनिराळ््या जिल्ह्यातून चारचाकी गाड्या या यात्रेत सहभागी होणार आहेत. शिवाय नागपुरात दाखल होण्याअगोदर वाडी येथून शेकडो दुचाकीदेखील यात्रेत सामील होतील. या यात्रेत ५०० हून अधिक चारचाकी गाड्यांत तीन हजारांहून अधिक विदर्भवादी नागरिक सहभागी होतील असा विश्वास जनमंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यात्रेचे अगदी परिपूर्ण नियोजन करण्यात आले असून वैद्यकीय चमूदेखील सोबत राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या यात्रेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. इच्छुक नागरिकांनी जनमंचच्या प्रीमियम प्लाझा, खरे टाऊन,धरमपेठ, नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)असा राहणार प्रवास२० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंदखेडराजा येथून या यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर चिखली, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर मार्गे सायंकाळी अमरावती येथे ती पोहोचेल. अमरावती येथे मुक्काम करून २१ सप्टेंबर रोजी मोझरी, तळेगाव, कारंजा, कोंढाळी, गोंडखैरी, वाडी, व्हेरायटी चौक, लोकमत चौक, रहाटे कॉलनी या मार्गाने ही यात्रा सायंकाळी ५.३० वाजता दीक्षाभूमी येथे पोहोचेल. दीक्षाभूमी येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल किलोर, जनमंचचे मार्गदर्शन चंद्रकांत वानखडे व प्रा.शरद पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.