लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे दिले त्यांचे सोमवारी दुपारी २ च्या सुमारास नागपुरात आगमन झाले. विमानतळावरून निघाल्यानंतर त्यांनी थेट दीक्षाभूमी गाठली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळासह दीक्षाभूमीवर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.यावेळी बोलताना ते म्हणाले, भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी राज्याचे ४० हजार कोटी परत पाठवले असे म्हटले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा. त्यांनी कुठलाही खुलासा जरी केला तरी हेगडे हे भाजपचे जबाबदार नेते आहेत. त्यांनी असे विधान केल्याने दाल में कुछ काला है, असे वाटते, असेही पुढे म्हटले.
विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:09 IST
विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी येथे केले
विदर्भाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील
ठळक मुद्देनागपुरात पोहचताच नितीन राऊत पोहचले थेट दीक्षाभूमीवरफडणवीस सरकारने महाराष्ट्राला केले कर्जबाजारी