लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवस दिलासा देणारी थंडी पुन्हा परतली आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा हुडहुडी भरविणारा ठरला. दोन दिवसांपासून घसरणारा नागपूरचा पारा गुरुवारी ११ अंशांवर गेल्याने गारठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. दुसरीकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही किमान तापमान १० अंशांवर गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानाची घसरण आठवडाभर कायम राहणार असून विदर्भाला थंड लाटसदृश्य स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
डिसेंबरचा महिना हा तसा थंडीचाच असतो. नोव्हेंबरचे शेवटचे दिवस व डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत पारा चढल्याने थंडीपासून जरा दिलासा मिळाला होता. मात्र, बुधवारपासून पुन्हा थंडी वाढायला लागली आहे. गेल्या काही दिवसात उत्तर भारतात जबरदस्त थंडी वाढली आहे. जम्मू काश्मीर, दिल्ली, पंजाब ते झारखंडपर्यंत थंड लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबच्या आदमपूर शहरात किमान तापमान ३ अंशांवर गेले आहे. गुरुवारी नागपूरचे रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशाने कमी होते. भंडारा, गोंदियाचा पारा सरासरीपेक्षा ३ अंशाने कमी आहे. वर्धा, वाशिम व यवतमाळ १२ अंशांवर आहेत, तर अमरावती, अकोला, गडचिरोली १३ अंशांवर आहेत. केवळ चंद्रपूर सर्वाधिक १४ अंशांवर आहे. पुढच्या दोन दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांचे किमान तापमान २ ते ३ अंशाने घसरण्याची शक्यता आहे.
Web Summary : Vidarbha experiences a cold snap as temperatures drop significantly. Nagpur recorded 11 degrees, with further decline expected. A cold wave-like condition is predicted for the region, with some districts possibly seeing temperatures fall by 2-3 degrees in the coming days.
Web Summary : विदर्भ में ठंड का प्रकोप बढ़ गया है, तापमान में भारी गिरावट आई है। नागपुर में 11 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, और गिरावट की आशंका है। क्षेत्र में शीत लहर जैसी स्थिति का अनुमान है, आने वाले दिनों में कुछ जिलों में तापमान 2-3 डिग्री तक गिर सकता है।