Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

By शुभांगी काळमेघ | Updated: August 28, 2025 20:31 IST2025-08-28T20:20:32+5:302025-08-28T20:31:58+5:30

Vidarbha Rain News Tomorrow: विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातील काही जिल्हे पूर्व विदर्भातील आहेत.

Vidarbha Rain Alert: Rain intensity will increase in 'these' districts of Vidarbha, IMD has issued a warning of alert | Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

Vidarbha Rain Alert: Rain intensity will increase in 'these' districts of Vidarbha, IMD has issued a warning of alert

Nagpur rain news in marathi: महाराष्ट्रातील इतर भागांबरोबरच विदर्भातहीपाऊस सुरू असून, काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उपराजधानी नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळणार असल्याचे आयएमडीने वर्तवले आहेत. 

विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस कोसळत असून, शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २९ ऑगस्ट रोजी अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

उर्वरित बुलढाणा, वाशिम, यवमतमाळ, नागपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

३० ऑगस्ट रोजीही विदर्भातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ऑगस्ट अखेरही आणि सप्टेंबरची सुरवात होणार पावसाने 

३१ ऑगस्ट या दिवशी बहुतेक जिल्ह्यांत हवामान खात्याने इशारा दिलेला नसला, तरी वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या भागांत हलक्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 

सप्टेंबरच्या (१ सप्टेंबर) पहिल्याच दिवशी अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट

दरम्यान, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Web Title: Vidarbha Rain Alert: Rain intensity will increase in 'these' districts of Vidarbha, IMD has issued a warning of alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.