शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील विधिज्ञ राजेश लड्ढा, संजय मेहरे उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

नागपूर : विदर्भातील विधिज्ञ राजेश लड्ढा व संजय मेहरे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नागपूर : विदर्भातील विधिज्ञ राजेश लड्ढा व संजय मेहरे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली.

सदर दोन्ही विधिज्ञ न्यायिक अधिकारी आहेत. राजेश लड्ढा सध्या राज्याच्या विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिवपदी कार्यरत आहेत तसेच, ते महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी ॲण्ड इंडियन मेडिएशन सेंटर ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सदस्य आहेत. याशिवाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर होते. परंतु, त्यांनी विधी क्षेत्रात करिअर घडवले. त्यांनी नागपूरमधून एलएल. बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर दारव्हा येथे वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दरम्यान, त्यांची थेट अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी न्यायिक अधिकारी पदश्रेणीमध्ये विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करून स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

संजय मेहरे हे सध्या नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश आहेत. ते २०२० पासून या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत या न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. ते मूळचे अकाेला येथील रहिवासी आहेत. त्यांनी अकोला येथून एलएल. बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अकोला येथेच वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी या क्षेत्रात अल्पावधीतच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांची अकोला जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी दोनवेळा निवड करण्यात आली. दरम्यान, मे-२००८ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांना पहिल्यांदा दादरा नगर हवेली येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी गडचिरोली, नांदेड व औरंगाबाद येथे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्य केले. नागपूरमध्ये येण्यापूर्वी ते मुंबईत धर्मादाय आयुक्त होते.

-----------------

कॉलेजियमची शिफारस मंजूर

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गेल्या १९ मार्च रोजी ९ वकील व ४ न्यायिक अधिकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली होती. न्यायिक अधिकाऱ्यांमध्ये लड्ढा व मेहरे यांच्यासह गोविंदा सानप व शिवकुमार दिघे यांचा समावेश होता. केंद्र सरकारने न्यायिक अधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार राष्ट्रपतींनी त्यांची अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली आहे.

-----------------

रिक्त पदांकडे वेधले होते लक्ष

लोकमतने ७ जून रोजी बातमी प्रकाशित करून, मुंबई उच्च न्यायालयामध्ये कायम न्यायमूर्तींची १५ व अतिरिक्त न्यायमूर्तींची १८ अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत याकडे लक्ष वेधले होते. तसेच, ही पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर या नियुक्त्यांची अधिसूचना जारी झाल्यामुळे विधी क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.