विदर्भासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांशी चर्चा करणार

By Admin | Updated: June 15, 2014 00:39 IST2014-06-15T00:39:11+5:302014-06-15T00:39:11+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी

Vidarbha to discuss with President, PM | विदर्भासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांशी चर्चा करणार

विदर्भासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांशी चर्चा करणार

व्ही कॅनचे साकडे : नितीन गडकरी यांचे आश्वासन
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्ही-कॅनच्या शिष्टमंडळाला दिले.
विदर्भ कनेक्टचे (व्ही-कॅन) अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वात शनिवारी एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते म्हणाले, मी स्वत: आणि भाजपा नेहमीच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या समर्थनार्थ आहोत. या मागणीला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने व्ही.कॅनच्या शिष्टमंडळाची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच चर्चा घडवून आणली जाईल. शिष्टमंडळात उपाध्यक्ष विष्णू मनोहर, सुधीर पालीवाल, कोषाध्यक्ष तेजिंदर सिंह रेणू, सहसचिव मोहित खजांची, डॉ. आशीष देशमुख, संदेश सिंगलकर, नितीन रोंघे, अक्षय सुदामे, अश्विनी देशपांडे, चंद्रगुप्त समर्थ, अ‍ॅड. ओंकार अभ्यंकर ॉसहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha to discuss with President, PM