शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायी कॅन्सरवर मिळविला विजय

By admin | Updated: February 4, 2015 00:58 IST

पोटात ३० सेंटिमीटरच्या दोन कॅन्सरचे ट्युमर असल्यावर अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. परंतु कामठी येथील रहिवासी हाजी अहमद नानथ यांनी दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या

३० सेमी.चे दोन ट्युमर काढले : अडीच वर्षांपर्यंत सहन केली पिडानागपूर : पोटात ३० सेंटिमीटरच्या दोन कॅन्सरचे ट्युमर असल्यावर अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. परंतु कामठी येथील रहिवासी हाजी अहमद नानथ यांनी दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या या घातक आजारावर विजय मिळवून आणि आज निरोगी जीवन जगत आहे. वेळेत आजाराचे निदान झाल्यास हे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’शी चर्चा करताना नानथ म्हणाले, कामठी येथील डॉ. रतन राय हे फॅमिली डॉक्टर आहेत. सहा वर्षांपूर्वी पोटात दुखत असल्याने, जेवण पचत नसल्याने त्यांच्याकडे तपासणी केली. त्यांनी या समस्येला गंभीरतेने घेतले. कानाच्या खाली असलेल्या गाठीची बायोप्सी करण्यास सांगितले. परंतु याकडे मी दुर्लक्ष केले. त्रास वाढत गेला. काही मित्राच्या सल्ल्यानंतर डॉ. राय यांच्याकडे जाऊन सोनोग्राफी केली. यात कॅन्सर असल्याचे निदान झाले. एमआरआय काढला. दिल्ली, मुंबई येथे चाचणी केली. तिथेही कॅन्सरच असल्याचे निदान झाले. शेवटी उपचारासाठी तयार झालो. कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ. स्मिता गुप्ते यांच्याकडे उपचार सुरू केला. सहा केमोथेरपी झाल्या. दोन्ही ट्युमर काढले. परंतु अडीच वर्षे जे वेदनादायी उपचार झाले, ते अन्य कुणालाही होऊ नये. आज निरोगी आहे, दोन वर्षांपासून सामान्य जीवन जगत आहे. (प्रतिनिधी)कुटुंबामुळेच आज जिवंतनानथ भावूक होत म्हणाले, कुटुंबांची साथ नसती तर आज जिवंत नसतो. त्यांच्या हिंमतीमुळेच हे उपचार घेऊ शकलो. कामठी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपद सोडून उपचार घेतले. नुकतेच कामठीमध्ये अब्दुल्लाह शाह बाबाच्या दरगाहमध्ये प्रशासक म्हणून वक्फ बोर्डने नियुक्त केले आहे. दरगाहच्या सेवेत आहे, असे हाजी अहमद नानथ म्हणाले.