शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटिलेटर ठरत आहे मृत्यूचे सापळे!

By admin | Updated: March 6, 2015 00:33 IST

स्वाईन फ्लूने नागपूर विभागात आतापर्यंत ७४ रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु या मृत्यूमागील कारणांचा अद्यापही कोणी शोध घेतला नाही. एकट्या मेडिकलमध्ये ३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

लोकमत विशेषसुमेध वाघमारे नागपूरस्वाईन फ्लूने नागपूर विभागात आतापर्यंत ७४ रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु या मृत्यूमागील कारणांचा अद्यापही कोणी शोध घेतला नाही. एकट्या मेडिकलमध्ये ३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यातील बहुसंख्य रुग्ण हे शेवटच्या घटकेला व्हेंटिलेटरवर होते. विशेष म्हणजे, व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाच्या रक्ताची तपासणी एबीजी (ब्लड गॅस एनलायझर) नावाच्या यंत्राने करणे आवश्यक असते. परंतु मेडिकलमध्ये हे यंत्रच उपलब्ध नाही. यामुळे व्हेंटिलेटरवरील अंदाजाने आॅक्सिजनचे प्रमाण कमी-जास्त केले जाते, तर दुसरीकडे विशेष तज्ज्ञाकडून हे यंत्र लावण्यात येत नसल्याने हे व्हेंटिलेटरच मृत्यूचे सापळे ठरत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यात अडचण जाते. अशा वेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम व्हेंटिलेटर अत्याधुनिक यंत्र करते. या यंत्राचे वैशिष्ट्य असे की जोपर्यंत रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे तोपर्यंत तो जगतो. यंत्र काढून टाकताच आणि रुग्ण सुस्थितीत आला नाही तर त्याची दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे संगणकाच्या आकाराचे हे यंत्र फार महत्त्वाचे ठरते. सद्यस्थितीत मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात पाच व्हेंटिलेटर आहेत. परंतु हे व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजन, कार्बनडाय आॅक्साईड व अ‍ॅसिड मोजण्यासाठी वापरण्यात येणारे ‘एबीजी’ हे यंत्रच नाही. यामुळे आधीच अत्यवस्थ असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांना अंदाजाने आॅक्सिजनचा पुरवठा केला जातो.अनुभव पडतो कमी मेडिकलमधील स्वाईन फ्लू वॉर्डात अत्यवस्थ रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचे काम निवासी डॉक्टरच करतात. परंतु या डॉक्टरांचा अनुभव व मशीनविषयी अभ्यास फार कमी असल्याने ते धोकादायक ठरण्याची शक्यता अधिक ठरते. कारण व्हेंटिलेटर लावण्यापूर्वी रुग्णाची श्वासोच्छवासाची प्रक्रिया बंद करावी लागते. अनेक वेळा रुग्णाच्या मेंदूचे कार्य बंद पडलेले असते, अशा वेळी डॉक्टरांना रुग्णाच्या मेंदूचे कार्य करावे लागते. यामुळे यात चूक होणे रुग्णाच्या जीवावरच बेतते.व्हेंटिलेटरमुळे वाचणाऱ्या रुग्णांची संख्या ५० टक्केमिळालेल्या माहितीनुसार, शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर लावून वाचलेल्या रुग्णांची संख्या ५० टक्के आहे. मोठ्या इस्पितळांमध्ये ही टक्केवारी ६० ते ७० दरम्यान आहे. भारतात ७० टक्क्यांच्यावर कुठलेही इस्पितळ गेले नसल्याचे आकडेवारी सांगते.