शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या महागच

By admin | Updated: July 21, 2014 00:53 IST

मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर

मिरची ५०, कोथिंबीर १०० : पावसामुळे फटकानागपूर : मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, असे संकेत विक्रेत्यांनी दिले आहेत. बाजारात उपलब्ध भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक कडधान्याचे दर कमी आहेत. प्रत्येकाला कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाजी खरेदीला जाणे शक्य नाही. बहुतांश खरेदी किरकोळ विक्रेत्यांकडून दारातच केली जाते. भाव जास्त असतात. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. त्यांनी कडधान्याचा आधार घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आवक कमीगेल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे आवक कमी झाली आहे. रविवारी किरकोळ बाजारात मिरची ५० तर कोथिंबीर १०० रुपये किलो होती. कोथिंबीर कितीही महाग असली तरीही प्रत्येकजण थोडीफार खरेदी करतोच. त्यामुळे इतर भाज्यांसोबत कोथिंबीर विक्रीला ठेवावी लागते, अशी प्रतिक्रिया किरकोळ विक्रेत्यांनी दिली. रविवारी कॉटन मार्केटमध्ये जवळपास १५० छोट्यामोठ्या गाड्यांची आवक होती. वांग्याला कीड लागल्याने ठोक बाजारातच २ रुपये किलो विक्री सुरू आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ठोक बाजारात पत्ताकोबी १० रुपये, फुलकोबी १५, तोंडले ८ ते १० आणि कोहळे ६ रुपये किलो दर होते. फुलकोबी कोल्हापूर, टमाटर नारायणगाव, इंदूर, हवेली, पत्ताकोबी बेळगाव व मूलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, कारले भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) येथून येत आहेत. सध्या भाज्यांना मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कांद-बटाटे ३० रुपयांवर स्थिरकेंद्र सरकारच्या निर्बंधानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव किरकोळमध्ये ३० रुपयांवर स्थिर आहेत. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक आहे. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. किरकोळमध्ये भाव दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो आहेत. रविवारी कळमन्यात भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. (प्रतिनिधी)