शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरला आज न्यायालयात हजर करणार

By admin | Updated: August 6, 2014 01:15 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रबंध संचालक प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह दोन

नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रबंध संचालक प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह दोन जणांची पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग या प्रकरणाचा तपास करीत असून उद्या ते प्रशांत वासनकर आणि अभिजित जयंत चौधरी यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. पोलिसांनी २७ जुलै रोजी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि आणखी एक संचालक अभिजित चौधरी यांना अटक केली होती. न्यायालयाने आधी या तिघांना २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला होता. त्यानंतर पुन्हा प्रशांत आणि अभिजितच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ६ आॅगस्टपर्यंत तर विनयच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ४ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. विनयच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्याने त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा सात दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. न्यायालयाने मात्र ही मागणी नामंजूर केली होती. न्यायालयाने विनयला १८ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली होती. (प्रतिनिधी)