शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सिमेंटचा वापर?

By admin | Updated: July 6, 2014 00:49 IST

जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट सिमेंटचा वापर केला जात असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी प्जलवाहिनीचे काम बंद पाडून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्या हवाली केले.

नागरिक संतप्त : जलवाहिनीचे काम रोखले नागपूर : जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट सिमेंटचा वापर केला जात असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी प्जलवाहिनीचे काम बंद पाडून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्या हवाली केले.गणेशपेठेतील गुजरवाडी परिसरात नळाच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या कडेला झालेले खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराने थातूरमातूर पद्धत अवलंबल्याचा आरोप आहे. सिमेंटचे फ्लोरिंग करण्यासाठी आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास सिमेंटची पोती भरलेले वाहन (एमएच ४९/ डी १८१७) घटनास्थळी आले. कंत्राटदाराकडून काम निकृष्टपणे केले जात असल्यामुळे नागरिकांचे त्यावर लक्ष होते. श्री नवदुर्गा उत्सव युवा मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी होते. सिमेंटची पोती खाली उतरवल्यानंतर कामगारांनी मसाला बनविण्यासाठी ती उघडली. श्री नवदुर्गा उत्सव युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हे सिमेंट मातीसारखे दिसले. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले. सिमेंट गडचिरोलीतील अंबर शक्ती कंपनीचे असले तरी पोत्यांवर आयएसआय मार्क नसल्यामुळे संतापात भर पडली. नागरिकांनी कंत्राटदाराला धारेवर धरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणाव वाढला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी सिमेंट भरलेले वाहन ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. हे सिमेंट नव्हे माती आहे, असा आरोप करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची संतप्त नागरिकांची मागणी होती. गणेशपेठचे ठाणेदार सुधीर नंदनवार यांनी प्रसंगावधान राखत नागरिकांना शांत केले. सिमेंट तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञांकडे पाठवू आणि ते निकृष्ट असल्याचा अहवाल मिळाल्यास कडक कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. त्यानंतर तणाव निवळला. (प्रतिनिधी)